आगामी फीचर्समुळे युजर्सना अधिक क्रिएटिव्हिटी करता येईल.
WhatsApp जगातील सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग ऍप्सपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार मेटा व्हॉट्सऍपच्या टेक्स्ट एडिटरशी संबंधित नवीन फीचर्सवर काम करत आहे. आगामी फीचर्स रिलीझ केल्यानंतर वापरकर्ते अधिक क्रिएटिव्हिटीसह या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील. बघुयात आगामी फीचर्स…
व्हॉट्सऍपचे नवीन फीचर्स त्याचे ड्रॉईंग टूल पूर्णपणे बदलू शकतात. Wabitinfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी टेक्स्ट एडिटरमध्ये नवीन फीचर्स आणण्यावर काम करत आहे. ज्यामुळे टेक्स्ट बॅकग्राउंड बदलणे, फॉन्ट्समध्ये स्विच करणे आणि टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये फ्लेक्सिबिलिटी यासारख्या गोष्टी करता येतील.
टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये फ्लेक्सिबिलिटी
इन्स्टंट मेसेजिंग ऍपच्या नवीन फिचरद्वारे, तुम्ही मजकूर पसंतीच्या पद्धतीने सेट करू शकाल. वापरकर्त्यांना टेक्स्ट अलाइन करणे सोपे होईल. तुम्ही इमेजच्या डिझाईननुसार टेक्स्ट अलाइन सेट करण्यास सक्षम असाल. टेक्स्टशी संबंधित या फीचर्समुळे युजर्सना भरपूर स्वातंत्र्य मिळेल.
टेक्स्ट बॅकग्राउंड बदलणे
या फीचरच्या मदतीने यूजर्स टेक्स्टची बॅकग्राउंड बदलू शकतील. तुम्हाला कोणताही मजकूर वेगळ्या पद्धतीने दाखवायचा असेल तर नवीन फीचर तुम्हाला खूप मदत करेल. याशिवाय, वापरकर्ते टेक्स्ट बॅकग्राउंड कलर बदलून कोणताही महत्त्वाचा मजकूर सहजपणे हायलाइट करू शकतात. हे फीचर वापरताना युजर्सना खूप मजा येईल.
फॉन्ट्समध्ये स्विच करणे
व्हॉट्सऍपच्या या फीचरमुळे यूजर्स फॉन्ट्समध्ये सहज बदल करू शकतील. कीबोर्डच्या वर आगामी फिचरचा पर्याय दिसेल. यासह, वापरकर्ते फोटो, व्हिडिओ आणि GIF एडिट करण्याचे स्किल्स दाखवू शकतात आणि फ्लेक्सिबिलिटीचा लाभ घेऊ शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.