महत्त्वाचे मीटिंग्स चुकणार नाही! Whatsapp युजर्स आता Calendar मध्ये ऍड करू शकतील कॉल लिंक

महत्त्वाचे मीटिंग्स चुकणार नाही! Whatsapp युजर्स आता Calendar मध्ये ऍड करू शकतील कॉल लिंक
HIGHLIGHTS

Whatsappने अलीकडेच 'कॉल लिंक' फीचर रिलीज केले होते.

तुम्ही आता Calendar ऍपमध्ये कॉल लिंक ऍड करू शकणार आहात.

कॉल लिंग तयार करताच, तुम्हाला 'Add to Calendar' असा नवा पर्याय दिसेल.

Whatsappने अलीकडेच 'कॉल लिंक' फीचर आणले आहे. या फीचरसह WhatsApp युजर्स ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी एक लिंक तयार करून संपर्कांना इन्व्हाईट करू शकतात. त्यानंतर आता या फीचरमध्ये प्लॅटफॉर्मने अपग्रेड केले आहे. यानंतर, तुम्ही आता Calendar ऍपमध्ये कॉल लिंक ऍड करू शकणार आहात. आता तुम्ही मिटींग्स लिंक तयार करायला विसरणार नाही. 

मात्र, एक लक्षात घ्या की हे फिचर सध्या केवळ iPhone युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. Whatsapp ने iOS वापरकर्त्यांसाठी App Store वर iOS 23.10.77 अपडेटसाठी WhatsApp जारी केले. यानंतर यूजर्सना अनेक नवीन फीचर्स मिळाले आहेत. यामध्ये कॅलेंडर ऍपमध्ये 'कॉल लिंक' जोडण्याचे फिचर दिले गेले आहे.

Add to Calendar पर्याय 

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp iOS वापरकर्त्यांना कॅलेंडर ऍपमध्ये कॉल लिंक जोडण्याची क्षमता दिली जाईल. तुम्ही कॉल लिंग तयार करताच, तुम्हाला 'Add to Calendar' असा नवा पर्याय दिसेल. कॅलेंडरवर जाऊन, तुम्ही ज्या तारखेसाठी कॉल लिंक तयार केली आहे त्या तारखेची कॉल लिंक ऍड करा.

कॉलिंग बटन फिचर 

WhatsApp ने अलीकडेच काही iOS बीटा वापरकर्त्यांसाठी एक नवीन कॉलिंग बटन आणले आहे. या फीचरमध्ये चॅट ओपन केल्यावर यूजर्सना उजव्या बाजूला फक्त एक बटण मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर त्यांच्यासमोर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचे दोन पर्याय येतील. मात्र, हे फिचर सध्या सर्व युजर्सकरता येणार नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo