WhatsApp स्टेटस हे उत्तम फीचर्सपैकी एक आहे. व्हॉट्सऍपवर स्टेटस टाकणे आणि आपल्या ऍक्टिव्हिटीज किंवा इतर गोष्टींची माहिती संपर्कांना देणे, आता दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आता लवकरच हे फीचर अपग्रेड करणार आहे. या अपग्रेडेशननंतर युजर्स स्टेटसवर हाय कॉलिटी फोटो आणि Video पोस्ट करू शकतील. हे फीचर्स आगामी अपडेटसह आणले जाणार आहे.
WhatsApp च्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर आणि आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, Google Play Store वर WhatsApp Beta Android 2.23.26.3 अपडेट उपलब्ध आहे. युजर्सना स्टेटस सेक्शनमध्ये HD ऑप्शन मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. याद्वारे युजर्स हाय-डेफिनिशनमध्ये स्टेटसवर फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करण्यास सक्षम असतील.
लक्षात घ्या की, सध्या हे फिचर डेव्हलपिंग स्टेजवर आहे. युजर्सची मागणी लक्षात घेऊन हे फीचर आणले जात असल्याचे मानले जात आहे. नव्या फिचरद्वारे स्टेटस पोस्ट करण्याची स्टाईल पूर्णपणे बदलणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व वापरकर्त्यांसाठी हे HD फिचर जारी केले जाईल. सध्या तरी WhatsApp ने या फीचरच्या लाँचबाबत कोणतेही अधिकृत अपडेट दिलेले नाही.
नव्या अपडेटमध्ये HD स्टेटस व्यतिरिक्त व्हॉट्सऍप शेअर म्युझिक ऑडिओ फीचरवरही काम करत आहे. रिपोर्टनुसार, हे फीचर सादर केल्यामुळे यूजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान गाणी डॆहील ऐकू शकतील. यासाठी यूजर्सला आधी व्हिडिओ कॉल करावा लागेल. यानंतर Continue बटण दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर यूजर्स व्हिडिओ कॉलमध्ये देखील गाणी ऐकू शकतील. लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जाईल.