WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत आहे. पण आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला विशेष फिचरबद्दल माहिती देणार आहोत. Status द्वारे युजर्स आपल्या रोजच्या घडामोडी किंवा विशेष ऍक्टिव्हिटीज आपल्या संपर्कांमध्ये शेअर करू शकतात. आगामी अपडेटची माहिती ताज्या लीक झालेल्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp येत्या काही दिवसांत एक मोठे अपडेट जारी करणार आहे. या अपडेटनंतर यूजर्स त्यांचे ‘WhatsApp Status’ दोन आठवड्यांपर्यंत लाईव्ह ठेऊ शकतील.
होय, मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टंट मेसेजिंग App आपल्या वापरकर्त्यांना स्टेटस लाईव्ह ठेवण्यासाठी एकूण चार कालावधीचे पर्याय देईल. चला तर मग बघुयात सविस्तर माहिती.
विश्वासनीय Wabetainfo च्या ताज्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, आगामी अपडेटमध्ये WhatsApp स्टेटस सेक्शनमध्ये काही नवीन बदल दिसले. अहवालानुसार, व्हॉट्सऍपने ‘Status’ अपडेट विभागात जे बदल केले आहेत, ज्याची एक झलक बीटा व्हर्जनमध्ये बघायला मिळाली आहे. खरं तर, यामध्ये सर्वात मोठा बदल युजरच्या प्रोफाईलवर दिसणार्या ‘Text Status’शी संबंधित दिसोतय.
होय, आता यूजर्सना टेक्स्ट स्टेटससाठी ‘Time Duration’ चा पर्याय मिळेल. आपल्याला माहिती आहे की, पूर्वी एकदा अपडेट केलेला Text Status नेहमीसाठी Live राहत होता. तथापि, आगामी अपडेटसह वापरकर्ते मर्यादित काळासाठी Text Status सेट करण्यास सक्षम असतील. खालील रिपोर्टमध्ये या नवीन अपडेटचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे.
वरील पोस्टवरून असे दिसून येते की, टेक्स्ट स्टेटससाठी काही नवीन डीफॉल्ट पर्याय सादर केले जातील. ज्यामध्ये Free to talk, Working, Travelling, Available to meet आणि Listening to music यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. तर दुसरीकडे स्टेटस टाइमर दिसून येत आहे. या टाइमरमध्ये युजर्सना स्टेटस लाईव्ह ठेवण्यासाठी 4 पर्याय दिले जातील, त्यासह 24 तास, 3 दिवस, 1 आठवडा आणि 2 आठवडे या ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे.