WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने अनेक नवीन फीचर्सची टेस्टिंग करत आहे. अँड्रॉइड आणि iOS या दोन्हीसाठी विविध नवीन फीचर्स सादर करण्यात आले आहेत. आता लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App ने एक नवीन फिचर आणले आहे, जे चॅट्स टॅबमध्ये AI पॉवर चॅट्स उघडण्यासाठी एक नवीन पर्याय ऑफर करत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्ये AI पॉवर्ड चॅट्स शोधण्याची गरज भासणार नाही. ते त्यांना शॉर्टकटद्वारे इतर चॅटमध्ये सहजपणे पाहू शकतील. चला तर मग जाणून घेऊयात नव्या फिचरची सविस्तर माहिती बघा.
आगामी फिचरची माहिती WhatsApp ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. नव्या आणि आगामी फिचरमध्ये चॅट सूचीमध्ये नवीन चॅटसाठी + आयकॉनच्या वर एक नवीन बटण उपलब्ध आहे. या बटणद्वारे वापरकर्ते AI पॉवर्ड चॅट्स ऍक्सेस करू शकतील. खालील अहवालात याचा स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये नवा शॉर्टकट स्पष्टपणे दिसत आहे.
लक्षात घ्या की, सध्या फक्त काही भाग्यवान बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. हे फिचर भविष्यात सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल. नवीन फीचर बीटा यूजर्ससाठी टेस्टिंग म्हणून आणले आहे. त्यानंतर ते स्थिर आवृत्तीसाठी लवकरच आणले जाईल.
कंपनी आणखी अनेक नवीन फिचरवर काम करत आहे. स्टेटस अपडेट्स पाहण्यासाठी शॉर्टकटही सुरू करण्यात येत आहे. आता तुम्ही त्या संपर्काचे स्टेटस चॅटमधूनच पाहू शकाल. जेव्हा एखादा संपर्क नवीन स्टेटस अपडेट करतो, तेव्हा चॅट अंतर्गत प्रोफाइल चिन्हावर एक सर्कल दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही थेट त्या संपर्काचे स्टेटस अपडेट पाहू शकता.