मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp iOS वर ईमेल ऍड्रेस फिचर आणत आहे. या फीचरद्वारे iPhone वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सऍप अकाउंटशी ईमेल ऍड्रेस लिंक करू शकतील. ऍप स्टोअरवरील अधिकृत चेंजलॉगमध्ये या नवीन फिचरचा उल्लेख नसला तरी, सुप्रसिद्ध टिपस्टर प्रकाशन WABetaInfo ने याबाबत पुष्टी केली आहे. WhatsApp अकाउंटशी ईमेल ऍड्रेस लिंक करण्यासाठी फिचर जारी करत आहे.
हे ईमेल ऍड्रेस फिचर उपयुक्त बॅकअप म्हणून येईल, विशेषत: अशा परिस्थितीत जेथे वापरकर्त्यांना SMS प्राप्त करण्यात अडचणी येत आहेत.
मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वापरकर्त्यांकडे अद्याप WhatsApp मध्ये लॉग इन करण्याची डीफॉल्ट पद्धत असेल, ज्यामध्ये SMS द्वारे 6-अंकी कोडची विनंती करणे देखील समाविष्ट आहे. WhatsApp खात्याशी ईमेल ऍड्रेस लिंक केल्यास अतिरिक्त लॉग-इन पद्धत मिळेल, परंतु नवीन खाते तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना अद्याप फोन नंबरची आवश्यकता असेलच.
जर तुम्हाला अजून हे फीचर मिळाले नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण ते सध्या रोल आउट केले जात आहे. भविष्यात ते सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आऊट केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन फीचरचा उद्देश खाती सुरक्षित ठेवणे आणि WhatsApp खात्यांवरील वापरकर्त्यांना अधिक पर्याय प्रदान करून युजर एक्सपेरियन्स वाढवणे हा होय.