Security साठी WhatsApp एक पाऊल पुढे! Email द्वारे Login करता येईल अकाउंट, ‘अशा’प्रकारे करा वापर। Tech News 

Security साठी WhatsApp एक पाऊल पुढे! Email द्वारे Login करता येईल अकाउंट, ‘अशा’प्रकारे करा वापर। Tech News 
HIGHLIGHTS

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp iOS वर ईमेल ऍड्रेस फिचर आणत आहे.

या फीचरद्वारे iPhone वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सऍप अकाउंटशी ईमेल ऍड्रेस लिंक करू शकतील.

हे ईमेल ऍड्रेस फिचर उपयुक्त बॅकअप म्हणून सादर केले जात आहे.

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp iOS वर ईमेल ऍड्रेस फिचर आणत आहे. या फीचरद्वारे iPhone वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सऍप अकाउंटशी ईमेल ऍड्रेस लिंक करू शकतील. ऍप स्टोअरवरील अधिकृत चेंजलॉगमध्ये या नवीन फिचरचा उल्लेख नसला तरी, सुप्रसिद्ध टिपस्टर प्रकाशन WABetaInfo ने याबाबत पुष्टी केली आहे. WhatsApp अकाउंटशी ईमेल ऍड्रेस लिंक करण्यासाठी फिचर जारी करत आहे.

हे ईमेल ऍड्रेस फिचर उपयुक्त बॅकअप म्हणून येईल, विशेषत: अशा परिस्थितीत जेथे वापरकर्त्यांना SMS प्राप्त करण्यात अडचणी येत आहेत.

WhatsApp account login via email
Credit: WABetaInfo

मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वापरकर्त्यांकडे अद्याप WhatsApp मध्ये लॉग इन करण्याची डीफॉल्ट पद्धत असेल, ज्यामध्ये SMS द्वारे 6-अंकी कोडची विनंती करणे देखील समाविष्ट आहे. WhatsApp खात्याशी ईमेल ऍड्रेस लिंक केल्यास अतिरिक्त लॉग-इन पद्धत मिळेल, परंतु नवीन खाते तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना अद्याप फोन नंबरची आवश्यकता असेलच.

Email Feature चा वापर कसा करावा?

  • सर्व प्रथम तुमचे WhatsApp ओपन करा.
  • त्यानंतर Settings वर जा आणि नंतर Account वर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला Email Address चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि Next वर क्लिक करा.
  • ईमेल खात्यावर प्राप्त झालेला 6 अंकी OTP प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.

जर तुम्हाला अजून हे फीचर मिळाले नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण ते सध्या रोल आउट केले जात आहे. भविष्यात ते सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आऊट केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन फीचरचा उद्देश खाती सुरक्षित ठेवणे आणि WhatsApp खात्यांवरील वापरकर्त्यांना अधिक पर्याय प्रदान करून युजर एक्सपेरियन्स वाढवणे हा होय.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo