WhatsApp आपल्या युजर्सच्या सोयी-सुविधांसह युजर्सना ऍप वारपण्यास मजा येईल, याची देखील काळजी घेतो. सध्या WhatsApp युजर्सना डीफॉल्ट थीम निवडू देण्यासाठी नवीन फिचरवर काम करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या इतर सेटिंग्ज वगळता केवळ निवडलेली म्हणजेच सिलेक्टेड थीम या ॲपवर काम करेल. सध्यासाठी WhatsApp थीम फोनच्या सेटिंग्जमध्ये असलेल्या डीफॉल्ट थीमवर अवलंबून आहे. चला तर मग जाणून घेऊयात, आगामी फीचरबद्दल सविस्तर माहिती-
Also Read: Vodafone Idea चा विशेष प्लॅन! दररोज 2.5GB डेटासह प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन Free, वाचा सविस्तर
पुढे आलेल्या रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने दोन नवीन नवीन थीम सादर करून आपल्या ॲपमध्ये बदल करणे, अपेक्षित आहे. जे सध्या वापरलेल्या ग्रीन थीमपेक्षा भिन्न असणार आहे. लाइट मोड निवडल्याने ॲप हिरव्या ते काळ्या रंगात बदलेल आणि त्यास आधुनिक स्वरूप देईल, अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे, डार्क मोड निवडल्यावर संभाव्यतः हिरवा रंग पांढरा होईल, ज्यामुळे एक विशेष कॉन्ट्रास्ट तयार होईल.
लक्षात घ्या की, WhatsApp iPhones वर चॅटिंग टॅबसाठी नवीन थीम तयार करण्यावर देखील काम करत आहे. नवे फिचर iPhone वापरकर्त्यांना व्हाईट, पिंक, क्लासिक ग्रीन, पर्पल आणि ब्लु यासह पाच कलर ऑप्शन्समधून त्यांचे चॅट वॉलपेपर आणि चॅट बबल निवडण्याची परवानगी देईल.
वर नमूद केलेले फीचर्स अद्याप वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले नाही. मात्र, हे फिचर बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच कथित फीचर्स लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. यूजर्स त्यांच्या आवडीनुसार ॲप कस्टमाइझ करू शकतील, त्यामुळे ऍप या फीचरवर काम करत आहे. या नवीन फिचरमुळे हे प्लॅटफॉर्म आणखी वैयक्तिकृत आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल होईल, अशी अपेक्षा आहे.