WhatsApp: मेटा स्वामित्व असलेले लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्सवर काम करत आहे. WhatsApp ने काही दिवसांपूर्वी चाचणीसाठी रीडिझाइन केलेले ड्रॉईंग एडिटर आणले होते. फोटो अधिक चांगल्या पद्धतीने एडिट करण्यासाठी त्यात अनेक एडिटिंग टूल्स आणले गेले आहेत. आता WhatsApp या आगामी ड्रॉईंग एडिटरमध्ये एक नवीन फीचर जोडण्याची तयारी करत आहे.
Also Read: Best Offers! लेटेस्ट Tecno Pova 6 Pro 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Buds देखील मिळतील Free
नव्या किंवा आगामी WhatsApp फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाईटच्या रिपोर्टमधून नव्या Color Chooser Tool फिचरची माहिती देण्यात आली आहे. होय, Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, Google Play Store वर उपलब्ध Android अपडेटमध्ये ‘Color Chooser Tool’ येत असल्याचे समोर आले आहे.
वरील पोस्टमधील स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येते की, नवीन कलर चुजर टूल WhatsApp च्या ड्रॉईंग एडिटरमध्ये स्क्रीनच्या बॉटमला उपलब्ध आहे. यासह युजर्स त्यांच्या आवडीचा रंग वापरून फोटो सहज एडिट करू शकतात. हे साधन वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
हे फिचर अचूक एडिटिंगची परमिशन देईल. यासह युजर्सना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आणखी आकर्षक बनवणे सोपे होईल. हे फिचर वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर विशिष्ट रंग निवडण्याचे स्वातंत्र्य देणार आहे. एकंदरीत यासह यूजर्स फोटो अधिक चांगल्या प्रकारे एडिट करू शकतात आणि आकर्षक बनवू शकतात.
भविष्यातील अपडेटसह नव्या फिचरसाठी समर्थन उपलब्ध असेल. नवे फिचर अजूनही डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. त्याबरोबरच, या फीचरची टेस्टिंग लवकरच सुरू होईल आणि ते बीटा वापरकर्त्यांसाठी रिलीज होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.