WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते. एवढेच नाही तर, WhatsApp युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची देखील अधिक काळजी घेते. आम्ही तुम्हाला सांगतो की, लवकरच इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सिक्योरिटी फिचर सादर करणार आहे. होय, ताज्या लीकनुसार, लवकरच व्हॉट्सॲपवर ‘Block Unknown Account Message’ नावाचे फीचर येणार आहे. चला तर मग, जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फिचरबद्दल अधिक माहिती-
‘Block Unknown Account Message’ या फीचरच्या नावाप्रमाणेच हे फीचर WhatsApp वर तुमच्याकडे येणारे अनोळखी अकाउंट्सचे मेसेज ब्लॉक करेल. Wabetainfo च्या ताज्या लीकमध्ये, Android 2.24.17.24 अपडेटसाठी WhatsApp बीटाद्वारे या नवीन फीचरची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, नवे फीचर लवकरच WhatsApp वर आणले जाईल. होय, हे फीचर अनोळखी अकाऊंटमधून येणारे मेसेज ब्लॉक करण्याचे कार्य करेल.
या फीचरद्वारे WhatsApp यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय व्हॉट्सॲपवर येणाऱ्या स्पॅम मेसेजपासूनही तुम्हाला सहज सुटका मिळेल. ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमधील स्टोरेज लवकर भरण्याची समस्याही आता संपुष्टात येईल. एकंदरीत हे फिचर आल्यास तुमच्या फसवणुक होण्याचे शक्यता नाहीच्या बरोबर असतील.
तुम्ही वरील पोस्टमधील स्क्रिनशॉटमध्ये बघू शकता की, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना येत्या काळात Advanced सेटिंग्जमध्ये ‘Block Unknown Account Message’ नावाचा टॉगल मिळणार आहे. हे टॉगल ऑन केल्यानंतर, अनोळखी खात्यातून येणाऱ्या मॅसेजेस मर्यादा ओलांडल्यानंतर WhatsApp आपोआप ते अकाउंट ब्लॉक करेल. होय, तुम्हाला ते अकाउंट स्वतंत्रपणे ब्लॉक करण्याची गरज उरणार नाही. यासह तुम्ही तुमची सुरक्षा आणि गोपनीयता कायम राहील.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे फिचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. WhatsApp लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र, विकासाच्या टप्प्यात असल्याने येत्या काळात हे फिचर इतर अपग्रेडसह सादर केले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.