Whatsapp : चॅट करणे होईल मजेशीर ! इमोजीजमध्ये होणार मोठे बदल

Updated on 18-Apr-2023
HIGHLIGHTS

Whatsapp वर Animated emojis फिचर येणार

हे फिचर डेस्कटॉप आणि मोबाइल ऍप्ससाठी तयार केले जात आहे.

'Stay Safe with WhatsApp' मोहीम सुरू

Whatsapp एका नव्या फीचरवर काम करतोय, त्यासोबत चॅट करणे अधिक मजेशीर होणार आहे. Wabetainfo ने सांगितले की, ''WhatsApp नवीन ऍनिमेटेड इमोजी तयार करत आहे. हे ऍनिमेटेड इमोजी टेलीग्राममध्ये येणाऱ्या ऍनिमेटेड इमोजीसारखे असू शकतात.'' 

Animated emojis फिचर

Whatsapp चे आगामी Animated emojis फिचरवर अजूनही काम सुरु आहे. अहवालानुसार, हे फिचर डेस्कटॉप आणि मोबाइल ऍप्ससाठी तयार केले जात आहे. नवे फिचर संपूर्ण टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लाँच होणार आहे. ज्या वापरकर्त्यांना चॅटिंग करता विनोद करण्याची सवय आहे. त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरणार आहे. हे फिचर कसे असेल त्याची माहिती खाली दिलेल्या ट्विटमध्ये मिळेल. 

 

https://twitter.com/WABetaInfo/status/1648104934103973892?ref_src=twsrc%5Etfw

 

नवा फिचर तयार करण्यासाठी Lottie लायब्ररी वापरली जाईल, त्यानंतर वापरकर्त्यांना ऍनिमेटेड इमोजी वापरता येणार आहे. लायब्ररी ऑप्टिमाइझ केली जाईल, जेणेकरून डिझाइनर सहजपणे ऍनिमेशन तयार करू शकतील. हे अनिमेशन इमोजी लहान इमेज साईजमध्ये ऑफर केले जातील. मात्र, यात उत्तम कॉलिटी मिळणार आहे. 

सिक्योरिटी फीचर्स

Whatsapp ने आपल्या यूजर्ससाठी नवीन सिक्योरिटी फीचर्स आणले आहेत. ही नवीन वैशिष्ट्ये तुमचे खाते पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात मदत करतील. यामध्ये Account Protect, Device Verification और Automatic Security Codes इत्यादींचा समावेश आहे. Whatsapp ने अलीकडेच 'Stay Safe with WhatsApp' मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये ते वापरकर्त्यांना सिक्योरिटी फीचर्स आणि टूल्सची माहिती देतील. ही मोहीम सुमारे 3 महिने सुरू राहणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :