WhatsApp सतत आपल्या यूजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. अलीकडेच कंपनीने मल्टिपल अकाउंट फिचर सादर केले आहे. त्यानंतर, आता मेसेजिंग App लवकरच AI तंत्रज्ञान जोडणार आहे. आता सर्वत्र AI चीच चर्चा सुरु आहे. या नव्या फीचरच्या आगमनाने वापरकर्त्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतील. एआय सपोर्ट युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे. आगामी फीचरसह WhatsApp शी संबंधित अचूक माहिती मिळेल, असा विश्वास आहे. चला तर मग या नव्या आणि एक्साइटिंग फिचरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, AI सपोर्टची टेस्टिंग सुरु आहे. हे फिचर सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. असा अंदाज आहे की, या वर्षाच्या अखेरीस जगभरातील सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर जारी केले जाईल. लक्षात घ्या की, सध्या AI फीचर लाँच करण्याबाबत मेसेजिंग App कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
WhatsAppच्या सर्व ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी साईट wabetainfo ने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, WhatsApp ने अपडेट 2.23.23.8 जारी केले आहे. या अंतर्गत अँड्रॉईड बीटा यूजर्सना AI सपोर्ट मिळू लागला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, वापरकर्त्यांना ‘Contact us’ विभागात AI सपोर्ट मिळेल. येथून वापरकर्त्याला त्याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची त्वरित उत्तरे मिळतील.
याद्वारे कंपनी आणि वापरकर्ते यांच्यातील संवाद अधिक चांगला होईल. हे वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा समर्थन प्रदान करेल, असा विश्वास दिला जात आहे.
अहवालानुसार, AI-जनरेटेड केलेले मॅसेज WhatsApp कस्टमर केअर समर्थनासाठी उपयुक्त ठरू शकतात, कारण ते संभाव्यपणे वापरकर्त्याच्या प्रश्नांना अधिक वैयक्तिकृत आणि प्रभावी निराकरणे प्रदान करतील. या सर्वांसह तुमच्या वेळेची अधिक बचत होणार आहे. याआधी आपल्याला WhatsAppबद्दल काही माहिती किंवा समस्येचे निराकरण हवे असल्यास, आपण यु-ट्यूब व्हीडिओ किंवा गुगलच्या सहाय्याने समस्येचे निराकरण शोधत होतो. मात्र, आगामी WhatsApp AI फिचरने हे काम अगदी सोपे आणि सहज होणार आहे.