ह्या नवीन रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये काही नवीन फीचर्स येणार आहेत. हे काही आठवड्यातच जो़डले जातील. ह्यात कॉल बॅक फीचर, व्हॉईसमेल, झिप फाइल शेअरिंग ह्यांचा समावेश आहे.
अलीकडेच व्हॉट्सअॅपमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनला जोडले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात एक फाइल शेअरिंग फीचरसुद्धा सामील केले गेले आहे. आणि आता एका नवीन रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये काही नवीन फीचर्स येणा-या काही आठवड्यात जोडले जाणार आहे. ह्यात कॉल बॅक फीचर, व्हॉईसमेल, झिप फाइल शेअरिंग ह्यांचा समावेश आहे.
फोनरडारने आपल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की , अॅनड्रॉईड आणि आयओएसवर व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच कॉल बॅक फीचर सामील केले जाईल. ह्याच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना कॉल बॅक करु शकता तेही एका क्लिक वर आणि तेही अॅप न उघडता. त्याचबरोबर आयओएस प्लेटफॉर्ममध्ये व्हॉइसमेल फीचरसुद्धा जोडले जाईल.
ह्या फीचरच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअॅपवर आपला कॉल रेकॉर्ड आणि व्हॉइसमेल पाठवू शकता. मात्र हे फीचर आपल्याला तेव्हाच दिसेल जेव्हा आपण व्हॉट्सअॅपच्या ह्या फीचरमध्ये असाल.
मागील रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले होते की, कंपनीने व्हॉट्सअॅपचे एक नवीन अपडेट आणले आहे, जेथे आपण एका ग्रुपमध्ये 256 लोकांना जोडू शकता. व्हॉट्सअॅपचा नवीन व्हर्जन 2.12.437 मध्ये हे अपडेट येईल. जो आता व्हॉट्सअॅपच्या अधिकृत साइटवर आहे. लवकरच हे अपडेट प्ले स्टोरवरसुद्धा येईल.