इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स देण्यासाठी सातत्याने बदल करत आहे. ऍपने काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या फिचरला लाँच केले आहे. WhatsApp ने टेक्स्ट एडिटिंग फीचर जारी केले आहे. या फीचरची आधी अँड्रॉईड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर टेस्टिंग सुरु होती. मात्र, सध्या हे फिचर फक्त Android यूजर्ससाठीच उपलब्ध असेल. लवकरच ते iOS साठी देखील जारी केले जाऊ शकते.
WABetaInfo ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सऍपच्या नवीन क्रिएटिव्ह टूल्स वापरकर्त्यांना नवीन फीचरसह सादर केलेल्या नवीन टूल्स आणि फॉन्टचा वापर करून फोटो, व्हिडिओ आणि GIF एडिट करण्यास अनुमती देईल.
व्हॉट्सऍप येत्या काही आठवड्यात टेक्स्ट एडिट फिचर अधिक वापरकर्त्यांसाठी आणण्यास सुरुवात करेल. नवीन फीचरमध्ये युजर्सना त्यांच्या आवडीनुसार टेक्स्ट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी, प्रथम तुम्हाला फोटो, व्हिडिओ आणि GIF उघडावे लागेल आणि त्यात मजकूर जोडावा लागेल. आता मजकूर निवडायचा आहे आणि त्यानंतर एक पॉप-अप विंडो उघडेल. येथून वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार कलर, अलाइनमेन्ट आणि फॉन्ट स्टाईल निवडण्यास सक्षम असतील.
WhatsApp आणखी एका नवीन अपडेटवर काम करत आहे, ज्यानंतर यूजर्सना मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळेल. व्हॉट्सऍपच्या या फीचरमुळे युजर्स कोणतीही चूक लवकर आणि सहज दुरुस्त करू शकतील. अहवालानुसार, वापरकर्ते त्यांचे संदेश पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत एडिट करू शकतील. एडिट मॅसेज एडिट लेबलसह चिन्हांकित केले जातील.