तुम्ही इन्स्टंट मेसेजिंग ऍप Whatsapp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर, 24 ऑक्टोबरनंतर अनेक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सऍप काम करणे बंद करेल, अशी माहिती मिळाली आहे. जर तुमचा फोन कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असेल तर व्हॉट्सऍप त्यामध्ये चालणार नाही, असे दिसून आले आहे. या फोनमध्ये Apple सारख्या मोठ्या कंपनीचाही समावेश आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! सुपर-फास्ट 5G इंटरनेट स्पीड मोफत मिळणार, Jio ची 5G WiFi सेवा भारतात लाँच
खरं तर, दरवर्षी WhatsApp अनेक जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमचा सपोर्ट बंद करतो. सपोर्ट थांबवण्याचा अर्थ असा आहे की, काही उपकरणांसाठी WhatsApp साठी नवीन अपडेट्स जारी केली जात नाहीत. प्री-इंस्टॉल केलेले ऍप काम करत राहते पण अपडेट्स नसल्यामुळे ऍपला नवीन फीचर्स मिळत नाहीत आणि सिक्योरिटीसाठी धोका असतो. यावर्षीही 25 ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून अनेक व्हॉट्सऍपसाठी सपोर्ट बंद होणार आहे.
जर तुमच्याकडे iOS 10, iOS 11, iPhone 5 आणि iPhone 5C असेल तर तुमचा फोन 25 ऑक्टोबरपासून व्हॉट्सऍपला सपोर्ट करणार नाही. मात्र, ते अपडेट करून, आपण व्हॉट्सऍप वापरण्यास सक्षम असाल. याबाबत Apple ने असेही म्हटले आहे की, iOS 10, iOS 11 वर चालणाऱ्या iPhones वर WhatsApp सपोर्ट बंद केला जाईल.
म्हणजेच, WhatsApp iOS 12 आणि वरील सर्व ऑपरेटिंग सिस्टमसह चालवता येते. जर तुम्ही iOS 11 वापरत असाल आणि WhatsApp चालवायचे असेल तर तुम्हाला नवीन iOS वर अपडेट करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, Android 4.1 आणि त्यावरील वर्जन असलेले सर्व Android स्मार्टफोन वापरकर्ते WhatsApp वापरू शकतात. Android 4.1 च्या खालील वर्जन असलेले सर्व फोन युजर्स WhatsApp वापरू शकणार नाहीत.