युजर्सच्या सुरक्षेसाठी WhatsAppचे पुढचे पाऊल ! लवकरच येणार नवीन सिक्योरिटी फीचर्स
WhatsAppच्या स्टे सेफ नावाच्या कॅम्पेनची घोषणा
आधीच ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सवर असणार फोकस
कॅम्पेनमध्ये 'या' फीचर्सवर असणार लक्ष
सध्या रोजच WhatsApp बद्दल काही ना काही नवीन ऐकायला मिळते. आता WhatsApp ने स्टे सेफ नावाच्या कॅम्पेनची घोषणा केली आहे. यामध्ये आधीच ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सवर फोकस असणार आहे. हे कॅम्पेन अनेक सेफ्टी सेंट्रिक फीचर्स जसे की, ब्लॉक अँड रिपोर्ट, टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि ग्रुप प्रायव्हसी आणि सेटिंग्स फीचर्सवर फोकस करत सलग तीन महिने चालेल, अशी माहिती मिळाली आहे.
फोन चोरी झाल्यास ऍपमधील डेटा सेफ राहील
हे कॅम्पेन यावर फिकर करतो की, WhatsApp मध्ये टू स्टेप वेरिफिकेशन का महत्त्वाचे आहे, जे ऑथेंटिकेट करण्यासाठी युजर्सना OTP ची गरज असते. जर तुमचा स्मार्टफोन हरवला तर अशात कुणी सिक्युरिटी पिनशिवाय ऍप सक्रिय करू शकणार नाही.
कॅम्पेनमध्ये 'या' फीचर्सवर असणार लक्ष
Your privacy remains our priority.
To better protect our users, we’re rolling out security features that give you more layers of privacy and more control over your messages
Check the below to see the new account defense updates.
— WhatsApp (@WhatsApp) April 13, 2023
मेटा या कॅम्पेनद्वारे ब्लॉक आणि रिपोर्ट फीचर्सबद्दल युजर्सना शिक्षित करण्याचे काम करणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करून पुढील कारवाईसाठी ऍपला रिपोर्ट करता येईल.
त्याप्रमाणेच, यामध्ये अनेक प्रायव्हसी फीचर्स हायलाईट करण्याचा प्रयत्न असेल. म्हणजेच प्रोफाइल फोटो एनेबल डिसेबल करणे, लास्ट सीन, इ. फीचर्सचा समावेश असेल. त्याबरोबरच, प्रायव्हसी सेटिंग आणि ग्रुप इन्व्हाईट सिस्टमसह ग्रुप सेफ्टी फीचर्सदेखील हायलाईट करेल. याद्वारे समजून येते की, WhatsApp आपल्या ग्राहकांच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीबाबत किती गांभीर्याने विचार करतो किंवा या बाबींकडे किती गांभीर्याने लक्ष देतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile