WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी नवनवीन फीचर्स जोडत आहे. ऍपने अलीकडे पोल, ऑनलाइन स्टेटस हाईड, DP हाईड, कम्युनिटी यासह अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. आता ऍप निवडक Android बीटा वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणत आहे.
हे सुद्धा वाचा : Android वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी द्यावे लागतील 'इतके' पैसे, वाचा Twitterचा पूर्ण प्लॅन
या फीचरमुळे व्हॉट्सऍप स्टेटसचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होऊ शकतो. ज्या यूजर्सना नवीन अपडेट मिळेल ते व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये व्हॉइस नोट्स अपडेट करू शकतील. म्हणजे यूजर्स व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये व्हिडिओप्रमाणेच ऑडिओ देखील टाकू शकतील.
व्हॉट्सऍपवर स्टेटस अपडेट केल्यावर तुम्हाला व्हॉईस नोटचा पर्यायही मिळेल. वापरकर्ते फोटो, टेक्स्ट, व्हिडीओ याप्रमाणेच नवीन पर्याय वापरू शकणार आहेत.
WABetaInfo ने हे फिचर शोधले आहे. रिपोर्टनुसार यूजर्सना हे फीचर बीटा व्हर्जन 2.23.2.8 वर मिळत आहे. वापरकर्त्यांना हा पर्याय फक्त टेक्स्ट स्टेटस विभागात मिळेल. त्यावर तुम्ही फक्त 30 सेकंदांपर्यंत व्हॉइस नोट ठेवू शकता.
स्टेटस लागू करताना कोणतेही रेकॉर्डिंग पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला डिस्कार्डचा पर्याय देखील मिळेल. व्हॉट्सऍपच्या इतर वैशिष्ट्यांप्रमाणे, व्हॉईस नोट्सचे हे वैशिष्ट्य देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येते. यामध्ये तुम्हाला प्रायव्हसीचा पर्यायही मिळेल. याच्या मदतीने तुमचे स्टेटस कोण पाहू शकते आणि कोण पाहू शकत नाही हे तुम्हाला ठरवता येईल.
ऍप लवकरच हे फिचर इतर वापरकर्त्यांसाठी देखील रोलआउट करेल.