digit zero1 awards

WhatsApp ने आणले अप्रतिम फीचर ! स्टेटस रिपोर्टसह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स

WhatsApp ने आणले अप्रतिम फीचर ! स्टेटस रिपोर्टसह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

WhatsApp आता नोटिफिकेशन्ससह म्यूट बटणचा पर्याय देत आहे.

नवीन अपडेटसह, बीटा वापरकर्ते आता स्टेटस अपडेटची तक्रार करू शकतील.

भविष्यात हे फीचर्स सर्व WhatsApp वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप रिपोर्ट स्टेटस अपडेट फीचर आणत आहे. नोटिफिकेशनसोबतच कायमसाठी म्यूट पर्यायही मिळणार आहे. मात्र, सध्या हे फीचर केवळ काही बीटा टेस्टर्ससाठी आणले जात आहे. 

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Xiaomi स्मार्ट TV अगदी निम्म्या किमतीत उपलब्ध, मर्यादित काळासाठी ऑफर

नोटिफिकेशनमध्ये म्यूट पर्याय मिळेल. 

 काही युजर्सना त्यांच्या मॅसेज नोटिफिकेशन्समध्ये म्यूटचा पर्यायही दिसू शकतो. खरं तर, WhatsApp ने हे फीचर 2017 मध्येच रिलीझ केले होते. मात्र, म्यूट बटण फक्त तेव्हाच दिसत होते, जेव्हा एखाद्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमधून मोठ्या प्रमाणात मेसेज येतात. या अपडेटनंतर म्यूट बटण नेहमी दिसेल.

WhatsApp रिपोर्ट स्टेटस अपडेट्स 

मेटाच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग ऍपच्या आगामी वैशिष्ट्याचा मागोवा घेणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने या नवीन फिचरची माहिती दिली आहे. टेस्टफ्लाइट अॅपवरून iOS 23.4.0.74 अपडेटसाठी WhatsApp बीटा इंस्टॉल केलेल्या काही बीटा परीक्षकांसाठी रिपोर्ट स्टेटस अपडेट्स फिचर अलीकडेच आणले गेले, अशी माहिती मिळाली आहे. आता ते नवीनतम Android बीटा वापरकर्त्यांसाठी देखील आणले जात आहे. 

 या पर्यायाच्या मदतीने, व्हॉट्सऍप वापरकर्ते मॉडरेशन टीमला सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या काही स्टेटस अपडेट्सची तक्रार करू शकतील.

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp स्टेटसच्या उजव्या बाजूला येणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर रिपोर्टचा पर्याय उपलब्ध होईल. हे फिचर सध्या तुमच्या खात्यासाठी सक्षम आहे की नाही हे जाणून घ्यायचे असल्यास, कोणतेही स्टेटस उघडा आणि तीन डॉट्सवर क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo