WhatsApp वर इतरांचे स्टेटस बघण्याची मजा काही औरंच असते. त्याद्वारे संपर्कांच्या आयुष्यात काय सुरु आहे किंवा स्वतःच्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत, ते संपर्कांसोबत सहजरित्या शेअर करता येते. मात्र, एकदा का स्टेटस ठेवलं तर, त्याचा अवधी केवळ 24 तासांचा असतो. Whatsapp ने आता एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे WhatsApp युजर्स 24 तासांनंतरही त्यांचे WhatsApp स्टेटस पाहू शकतात. खरं का? चला बघुयात –
या फीचरचे नाव WhatsApp Archive असे आहे. हे फीचर WhatsApp बिझनेस ऍपसाठी आणले गेले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे पूर्वी शेअर केलेले स्टेटस पुन्हा पाहू शकतील. तसेच, तुम्ही ते तुमच्या प्रोफाईलद्वारे देखील तुमच्या ग्राहकांसोबत सहज शेअर करू शकणार आहात.
WAbetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp Archive फीचर आणले गेले आहे. हे सध्या WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांसाठी निवडक Android बीटा टेस्टर्ससाठी आणले जात आहे. आगामी काळात नवीन फीचर मेटाद्वारे उर्वरित वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, स्टेटस आर्काइव्ह फीचर WhatsApp द्वारे स्टेटस टॅबमध्ये दिसेल. हे फीचर ऑटोमॅटिक अपडेटद्वारे उपलब्ध होणार आहे. यासह वापरकर्ते अर्काइव्ह स्टेटस मॅनेज करण्यास सक्षम असतील. या फिचरमुळे, लोकांचा स्टेटस तयार करण्याचा आणि परत परत लावण्याचा वेळ वाचेल. याद्वारे तुम्हाला सहज तुमच्या काँटॅक्ट्सपर्यंत पोहोचता येईल.