मागील काही दिवसांपासून WhatsApp वर सर्च बाय डेट फीचरची चर्चा सुरु होती. आता हे बहुचर्चित फीचर अखेर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या WhatsApp चॅनलवर या फीचरची माहिती दिली आहे. नवीन फिचर वापरणे खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या फिचरबद्दल सविस्तर माहिती-
हे सुद्धा वाचा: Samsung च्या Popular 5G फोनचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
Search by date फिचर वापरकर्त्यांना चॅटमध्ये विशिष्ट तारीख निवडून संदेश शोधण्याची अनुमती देईल. याच्या मदतीने यूजर्स आता कोणत्याही चॅटमधील महत्त्वाचे मेसेज सहज शोधू शकतात. फीचरच्या मदतीने यूजर्स संपूर्ण चॅटमधील सर्व मेसेज स्किप करू शकतील आणि विशिष्ट तारखेचे मेसेज शोधण्यास सक्षम असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फिचर Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी जागतिक स्तरावर आणले गेले आहे. नवीन फीचर वापरण्यासाठी युजर्सना आधी ॲप अपडेट करावे लागेल. WhatsApp वेब वापरकर्त्यांसाठी आणि मॅक डेस्कटॉपसाठी देखील हे फिचर लाईव्ह झाले आहे.
जाणून घ्या Search by date वापरण्याची Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया:
अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण चॅटमधील सर्व मॅसेज वगळून थेट त्या तारखेच्या चॅटवर पोहोचणार आहात.
अशा प्रकारे अगदी सोप्या रीतीने आपण तारखेनुसार संदेश शोधण्यास सक्षम असाल.