WhatsApp: प्रियजनांना द्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा! पहा स्टेटस, Video आणि स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे?
WhatsApp वर तुमच्या प्रियजनांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा द्या.
तुम्ही WhatsApp वर मेसेजसह स्टिकर, Video पाठवून देखील शुभेच्छा देऊ शकता.
पहा WhatsApp स्टिकर, Video आणि स्टेटस डाउनलोड कसे कराल?
WhatsApp: 2024 श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारला सुरुवात झाली आहे. म्हणजेच आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना विशेषतः भगवान शिवाच्या उपासनेसाठी ओळखला जातो. या महिन्यात अनेक भारतीय आपल्या देवावरील भक्तीसाठी उपास देखील करतात. या काळात दर सोमवारी शिव-शंकरांचीची पूजा केल्याने घरात शांती आणि सकारात्मकता येते, अशी मान्यता आहे.
जर तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना या दिवशी WhatsApp विशेष शुभेच्छा पाठवायचे असतील. WhatsApp वर शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला Video, स्टिकर्स किंवा स्टेटस डाऊनलोड करायचे असतील, तर तुम्हाला ते कसे करता येईल? सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
WhatsApp वर स्टेटस, Video आणि स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे?
जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना किंवा इतरांना कोणतेही स्टेटस, व्हिडिओ किंवा स्टिकर डाउनलोड करायचे असतील तर, ते WhatsApp वर करणे खूप सोपे आहे.
WhatsApp वर स्टेटस कसे डाउनलोड करायचे?
- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा.
- यानंतर चॅटसह दिसणाऱ्या स्टेटस ऑप्शनवर जा.
- येथे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींनी आणि मित्रांनी पोस्ट केलेले सर्व स्टेटस पाहायला मिळणार आहेत.
- तुम्हाला डाउनलोड करायचे असलेल्या कोणत्याही WhatsApp स्टेटसवर क्लिक करा.
- स्टेटस पाहिल्यानंतर, तुमच्या फोनचा फाइल मॅनेजर किंवा गॅलरी ओपन करा.
- यानंतर, WhatsApp फोल्डरमध्ये जा, तिथे ‘स्टेटस’ नावाचे फोल्डर असेल.
- त्या फोल्डरमध्ये तुम्हाला तुम्ही पाहिलेल्या स्टेटस सापडतील.
- आता तुम्हाला डाउनलोड करायचे असलेली स्टेटस क्लिक करा आणि धरून ठेवा आणि ‘सेव्ह’ किंवा ‘डाउनलोड’ ऑप्शन सिलेक्ट करा.
स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी काय करावे?
- WhatsApp वर तुमच्या मित्रांनी पाठवलेले स्टिकर्स ओपन करा.
- तुम्हाला डाउनलोड करायचे असलेल्या स्टिकरवर प्रेस करा.
- स्टिकरवर प्रेस करून लॉन्ग प्रेस करा आणि नंतर ‘डाउनलोड’ किंवा ‘सेव्ह’ पर्याय निवडा.
- आता ते स्टिकर तुमच्या स्टिकर गॅलरीत सेव्ह केले जाईल.
Video डाउनलोड करण्यासाठी काय करावे?
- तुम्हाला WhatsAppवर डाउनलोड करायचा असलेला व्हिडिओ ओपन करा.
- व्हिडिओ प्ले होत असताना शीर्षस्थानी एक डाउनलोड ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर प्रेस करून ठेवा.
- यानंतर, Video तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह केला जाईल.
वरील सर्व सोप्या प्रक्रियेनुसार WhatsApp वर स्टेटस, व्हिडिओ आणि स्टिकर्स डाउनलोड करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile