व्हॉट्सअॅपच्या सर्वात खास व्हर्जनच्या माध्यमातून कॉल, मेसेज, फोटो, व्हिडियो फाइल, आवाज हे सर्व काही एका खास कोडच्या माध्यमातून यूजरजवळ पोहोचेल.
सर्वांमध्ये लोकप्रिय असलेले मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. ह्या नवीन फिचरच्या माध्यमातून आता कोणीही तुमचे व्हॉट्सअॅपवरील मेसेज वाचू शकणार नाही. ह्याचाच अर्थ आता व्हॉट्सअॅपवर आपल्याद्वारे पाठवले गेलेले संदेश तुमच्याशिवाय फक्त आणि फक्त तो व्यक्ती वाचू शकेल, ज्याला तुम्ही संदेश पाठवला आहे. आता सरकारसुद्धा तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सअॅप मेसेज अशा कोडमध्ये जाईल जो कोणीही वाचू शकणार नाही. व्हॉट्सअॅप मेसेजला आता हॅकरसुद्धा इंटरसेप्ट करु शकणार नाही. व्हॉट्सअॅपच्या सर्वात खास व्हर्जनच्या माध्यमातून कॉल, मेसेज, फोटो, व्हिडियो फाइल, आवाज हे सर्व काही एका खास कोडच्या माध्यमातून यूजरजवळ पोहोचेल.
यूजर्सला एक असा प्लॅटफॉर्म द्यावा, जेथे ते कोणत्याही भीतीशिवाय आपले खाजगी मेसेज आपल्या जवळच्या व्यक्तिला पाठवू शकतील, हाच व्हॉट्सअॅपचा हे फीचर आणण्याचा मूळ उद्देश आहे. मागील अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याचे अनेक घटना ऐकायला मिळत आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर्स प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ह्यावर एक तोडगा म्हणून व्हॉट्सअॅपने हे फीचर आणण्याचा निर्णय घेतला आहे.