व्हाट्सॅप ने एंड्राइड आणि iOS यूजर्स साठी जारी केला आपला ‘डिसमिस अॅज अॅडमिन’ फीचर
हा फीचर व्हाट्सॅप च्या एंड्राइड वर्जन 2.18.116 आणि iOS वर्जन 2.18.41 वर उपलब्ध आहे.
व्हाट्सॅप काही काळापासून ग्रुप चॅट साठी आपल्या नव्या फीचर ची बीटा टेस्टिंग करत होता. ज्याच्या माध्यमातून अॅडमिन अन्य अॅडमिनिस्ट्रेटर्सना डिसमिस किंवा डिमोट करू शकतो. व्हाट्सॅप ने आता आपल्या एंड्राइड आणि iOS यूजर्स साठी नवीन अपडेट जारी केला आहे. हा फीचर व्हाट्सॅप च्या एंड्राइड वर्जन 2.18.116 आणि iOS वर्जन 2.18.41 वर उपलब्ध आहे. कंपनी ने हा नवीन फीचर जारी केला आहे आणि लवकरच प्ले स्टोर वर येणार्या अपडेट मधून एंड्राइड यूजर्सना हा अपडेट मिळेल.
याआधी अॅडमिन दुसर्या यूजर्सना प्रमोट करू शकत होता, पण त्यांना डिमोट करण्यासाठी किंवा पदावरून काढून टाकण्यासाठी त्यांचे ग्रुप सोडून जाणे अनिवार्य होते आणि त्यानंतर एका सामान्य सदस्याप्रमाणे त्यांना पुन्हा ग्रुप मध्ये अॅड करावे लागत होते. आता या लेटेस्ट अपडेट नंतर यूजर्स अगदी सहज हे काम करू शकतील. त्यासाठी यूजर्स ना ग्रुप ओपन करावा लागेल आणि त्यानंतर ग्रुप इन्फो वर जाऊन पार्टिसिपेंट वर टॅप करावी लागेल.
जो सदस्य अॅडमिन नाही त्याच्यासमोर तुम्हाला मेक अॅडमिन पर्याय दिसेल आणि जो सदस्य आधीपासून अॅडमिन आहे त्याच्यासमोर तुम्हाला डिसमिस अॅज अॅडमिन पर्याय दिसले. पण, यात तुम्ही फक्त इतर सदस्य अॅडमिन्सना अॅडमिन पोस्ट वरून डिसमिस करू शकता पण ग्रुप क्रिएटर ला अॅडमिन पोस्ट वरून काढू शकत नाही.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सॅप मध्ये काही नवीन फीचर्स पण सामिल झाले आहेत ज्यात अचानक डिलीट झालेल्या कोणतीही मीडिया फाइल डाउनलोड करने याचा समावेश आहे. हे फिचर सर्व प्रकारच्या मडिया ला सपोर्ट करते. जसे GIF, तस्वीरें, वॉइस मेसेज, विडियो आणि डाक्यूमेंट्स इत्यादी. व्हाट्सॅप ने आपल्या व्हाट्सॅप पेमेंट प्लेटफार्म वर नवीन रिक्वेस्ट मनी फीचर पण समाविष्ट केला आहे. या फीचर च्या माध्यमातून यूजर्स आपल्या मित्रांकडून किंवा फोन मध्ये असलेल्या कॉन्टेक्ट्सना पैसे पाठवण्याची रिक्वेस्ट करू शकतो. हा फीचर सध्या बीटा टेस्टिंग मध्ये आहे.