व्हाट्सॅप ने ग्रुप्स साठी आणला हा महत्वपूर्ण फीचर
व्हाट्सॅप आता यूजर्सना नवीन विकल्प दाखवेल ज्या वर जाऊन सरळ आपण त्या मेसेज वर जाऊ शकतो ज्यात आपल्याला मेंशन करण्यात आले आहे. हा एक चांगला फीचर आहे.
व्हाट्सॅप सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग अॅप आहे. मग सिंगल चॅट असो वा ग्रुप चॅट, व्हाट्सॅप ने ने नेहमीच बेस्ट फीचर्स दिले आहेत. आता कंपनी ने व्हाट्सॅप ग्रुप्स मध्ये नवीन फीचर्स आणून मेसेजिंग एक्सपीरियंस अजून पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे. व्हाट्सॅप ने आपल्या एंड्राइड यूजर्स साठी नवीन फीचर आणला आहे ज्यामुळे यूजर्स सहज ग्रुप मध्ये बघू शकतात की कुठे त्यांना मेंशन करण्यात आले आहे. व्हाट्सॅप आता यूजर्सना नवीन विकल्प दाखवेल ज्या वर जाऊन सरळ आपण त्या मेसेज वर जाऊ शकतो ज्यात आपल्याला मेंशन करण्यात आले आहे. हा एक चांगला फीचर आहे. या आधी यूजर्सना मेंशन्स बघण्यासाठी मॅन्युअली चेक करावे लागत होते, पण आता हे सोप्पे झाले आहे.
ग्रुप विंडो चेक करण्याचा आता पण एक सोप्पा उपाय आहे जो चॅट विंडो मध्ये फ्लोटिंग "@" पर्याया अंतर्गत एक्सेस केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, यूजर्स ग्रुप च्या कोणत्याही मेंबर ला बघण्यासाठी ग्रुप इन्फो पेज पर्यायाचा वापर करण्यास पण सक्षम असतील.
व्हाट्सॅप ग्रुप्स मध्ये जनरल अपडेट्स व्यतिरिक्त, अॅप मध्ये अन्य फंक्शनालिटी पण येतील ज्यांची वाट खुप काळापासून पाहिली जात आहे. हे ग्रुप मधून एग्जिट केल्यानंतर पुन्हा एकदा अॅड करण्यावर प्रतिबंध लावणे आहे. खुप काळापासून या फीचर गरज होती कारण स्पॅमर्स याचा फायदा घेत होते. पण, अजून ही माहिती समोर आली नाही की हा फीचर कशा प्रकारे वापरता येईल. पण लवकरच हा फीचर यूजर्स साठी उपलब्ध होईल.
हे तर सर्वांनाच माहिती आहे की व्हाट्सॅप यूजर एक्सपीरियंस सुधारण्यासाठी कठोर पाऊले उचलत आहे आणि सतत नवीन अपडेट्स आणत आहे. Facebook ने डेवलपर कांफ्रेंस मध्ये सांगितले होते की व्हाट्सॅप मध्ये लवकरच ग्रुप विडियो चॅट आणि स्टीकर्स फीचर सामील होतील. सोबत कंपनी काही कडक पाऊल उचलत आहे ज्यामुळे स्पॅमर्स मुळे एक्सपीरियंस बिघडणार नाहीत जसे की अॅप मधून खोट्या बातम्या पसरवणे, खासकरून भारता सारख्या देशात.
बोलले जात आहे की हे सर्व फीचर एंड्राइड आणि iOS यूजर्स साठी उपलब्ध झाले आहेत पण आम्ही चेक केल्यावर हे फीचर अजून उपलब्ध नव्हते. त्यामुळे ज्या यूजर्सना हा अपडेट मिळाला नाही ते वाट बघू शकतात.