व्हाट्सॅप ने एंड्राइड आणि iOS यूजर्स साठी नवीन ग्रुप विडियो कॉल फीचर जारी केला आहे, पण सध्यातरी हा फीचर काही निवडक यूजर्स साठी जारी करण्यात आला आहे. व्हाट्सॅप यूजर्स iOS 2.18.52 वर्जन नंबर वर हा नवीन फीचर बघू शकतील, तर व्हाट्सॅप बीटा यूजर्स एंड्राइड प्लेटफार्म वर 2.18.145 वर्जन किंवा त्या पुढील वर्जन वर हा फीचर बघू शकतील. जर तुमच्या विडियो कॉल इंटरफेस वर हा फीचर दिसल्यास तुम्ही इतर तीन यूजर्सना विडियो कॉल मध्ये जोडू शकाल आणि ग्रुप विडियो कॉल फीचर ची मजा घेऊ शकाल. फेसबुक ने काही दिवसांपूर्वी F8 डेवलपर्स कांफ्रेंस मध्ये या नवीन फीचर बद्दल घोषणा केली होती.
खुप दिवस व्हाट्सॅप स्टीकर फीचर बद्दल पण रुमर्स समोर येत आहेत पण अजून हा फीचर अधिकृत पणे जाहिर करण्यात आला नाही. व्हाट्सॅप विडियो कॉल फीचर सध्यातरी काही यूजर्स साठी जारी करण्यात आला आहे. WABetaInfo ने ट्वीट च्या माध्यमातुन या बातमीची माहिती दिली होती कि अनेक यूजर्स च्या स्मार्टफोन मध्ये हा नवीन फीचर दिसला आहे. आम्ही आमच्या स्मार्टफोन मध्ये या फीचर ची उपलब्धता बघितली पण हा फीचर उपलब्ध झाला नाही. जर तुम्हाला पण हा फीचर मिळाला नसल्यास तुम्ही अजून थोडा वेळ वाट बघू शकता.
जर तुम्ही व्हाट्सॅप चे लेटेस्ट वर्जन वापरत असाल आणि चेक करु इच्छित असाल की हा फीचर तुमच्या डिवाइस मध्ये उपलब्ध झाला आहे की नाही तर तुम्ही कॉल्स सेक्शन मध्ये जाऊन कोणत्याही एका यूजर ला कॉल लावा आणि तुम्हाला इतर यूजर्सना कॉल मध्ये जोडण्याचा पर्याय मिळाल्यास तुमच्या अॅप्लीकेशन मध्ये हा फीचर सामील झाला आहे नाही तर तुम्हाला पुढील अपडेट्स ची वाट बघावी लागेल.