व्हाट्सॅप ने आपल्या 1.5 बिलियन यूजर्स असलेल्या iOS आणि एंड्राइड डिवाइसेज साठी ग्रुप कॉलिंग फीचर जाहीर केला आहे. या ग्रुप कॉलिंग फीचर मुळे एकच वेळी चार लोकांशी एक साथ बोलू शकता. ग्रुप कॉल सुरू करण्यासाठी यूजरला कोणा एकाला विडियो कॉल करुन अॅड पार्टिसिपेंट बटन वर टॅप करावे लागेल जो स्क्रीन च्या उजव्या बाजूला दिसेल.
मे मध्ये झालेल्या फेसबुक च्या F8 डेवलपर कांफ्रेंस मध्ये व्हाट्सॅप ने या फीचर बद्दल घोषणा केली होती. व्हाट्सॅप ने 2016 मध्ये विडियो चॅट आणि 2014 मध्ये वॉयस चॅट सादर केली होती.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सॅप ने स्पष्ट केले होते की आता कोणताही यूजर एक मेसेज फक्त 5 चॅट्स वर शेयर करू शकतो. हा फॉरवर्ड लिमिटिंग फीचर आता एंड्राइड आणि iOS च्या सर्व यूजर्सना देण्यात आला आहे.