WhatsApp Update: ग्रुपसाठी आले नवे Events फिचर, युजर्सच्या महत्त्वाच्या कामांसाठी ठरेल उपयुक्त 

WhatsApp Update: ग्रुपसाठी आले नवे Events फिचर, युजर्सच्या महत्त्वाच्या कामांसाठी ठरेल उपयुक्त 
HIGHLIGHTS

WhatsApp ने Events in Groups फिचर रोल आऊट केले आहे.

मे 2024 मध्ये WhatsApp कम्युनिटीसाठी इव्हेंट फीचर जारी करण्यात आले होते.

WhatsApp Events द्वारे तयार केलेला मॅसेज अगदी कॅलेंडरच्या आमंत्रणासारखा असेल.

WhatsApp Events in Groups: इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स अपडेट आणत असते. आता प्रदीर्घ चर्चित Events in Groups फिचर रोल आऊट केले आहे. त्याचे समर्थन व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये उपलब्ध असेल. हे नवीन फिचर युजर्ससाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या नवीन फिचरद्वारे, वापरकर्ते मित्रांना भेटण्यासाठी किंवा व्यावसायिक मीटिंगसाठी ग्रुप इव्हेंट तयार करू शकतात.

Also Read: Airtel ने देखील वाढवल्या प्लॅन्सच्या किमती! पुढील महिन्यापासून लागू होणार नवे दर, बघा संपूर्ण डिटेल्स

Events in Groups फिचरच्या आगमनाने, नियोजन प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मे 2024 मध्ये WhatsApp कम्युनिटीसाठी इव्हेंट फीचर जारी करण्यात आले होते. मात्र, आता हे फिचर ग्रुपसाठी जारी केले गेले आहे.

WhatsApp Events in Groups फिचर

WhatsApp Events द्वारे तयार केलेला मॅसेज अगदी कॅलेंडरच्या इन्वाइट्ससारखा असेल. त्यात तारीख, वेळ आणि ठिकाण यांसारखे तपशील तुम्हाला टाकता येतील. ग्रुपचे इतर सदस्य मॅसेजला रिप्लाय देऊन त्यांच्याशी सहमती दर्शवू शकतात. सदस्यांचे रिप्लाय फक्त त्या मेसेजमध्येच दिसेल. एवढेच नाही तर, ही चॅट पिनही करता येते. यामुळे ग्रुप ॲडमिनिस्ट्रेटरला इतर सदस्यांना व्यासपीठावरील मीटिंगसाठी वारंवार आठवण करून देण्याची गरज उरणार नाही.

WhatsApp चे इव्हेंट फीचर लाँच करण्यात आले आहे. हे टूल लवकरच Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये सुद्धा इव्हेंट फीचरचे सपोर्ट असेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

WhatsApp चे आगामी फिचर

WhatsApp Events in Groups फिचर
WhatsApp

WhatsApp सध्या कम्युनिटी ग्रुप्ससाठी रिप्लाय फीचर सुरू करण्याचा तयारीत आहे. या आगामी फीचरमुळे यूजर्स कम्युनिटी ग्रुपमधील कोणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ शकतात. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. हे फिचर येत्या काही दिवसांत स्थिर वापरकर्त्यांसाठी लाँच केले जाईल, अशा अफवा आहेत. मात्र, हे फीचर लाँच करण्याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo