पाठवण्या आधी आता ऐकू शकाल आपला व्हाट्सॅप वॉइस मेसेज

Updated on 27-Apr-2018
HIGHLIGHTS

हा फीचर व्हाट्सॅप iOS यूजर्स साठी उपलब्ध झाला आहे आणि लेटेस्ट बीटा अपडेट मध्ये एंड्राइड यूजर्स साठी हा फीचर सादर करण्यात आला आहे.

गूगल प्ले बीटा प्रोग्राम वर रजिस्टर्ड एंड्राइड यूजर्स साठी व्हाट्सॅप ने नवीन 2.18.123 बीटा अपडेट जारी केला आहे. या नवीन अपडेट मध्ये “सेव वॉइस मैसेज” फीचर सामील आहे. जसे की फीचर च्या नावावरून समजत आहे की या फीचर मुळे वॉइस रिकॉर्डिंग सेव होईल. 

उदाहरणार्थ, जर तुम्ही कोणा यूजरला ऑडियो फाइल पाठवण्यासाठी रेकॉर्ड करात आहात, पण त्याचवेळी तुम्हाला एखादा वॉइस कॉल आल्यास तुम्हाला रेकॉर्डिंग थांबवावी लागेल आणि त्याचवेळी हे फीचर उपयोगी ठरेल. हो त्यावेळी या फीचर मुळे वॉइस रेकॉर्डिंग फाइल सेव होईल. पण यूजर्स तीच ऑडियो रेकॉर्डिंग पुन्हा तिथूनच रेकॉर्ड करू शकणार नाहीत. यूजर्स ती रेकॉर्डिंग ऐकू शकतात आणि जर रेकॉर्डिंग बरोबर असेल तर ती पाठवू शकतात. 
सेव झालेली रेकॉर्डिंग एक्सेस करण्यासाठी तुम्हाला चॅट स्क्रीन वर जावे लागेल. हा फीचर व्हाट्सॅप iOS यूजर्स साठी उपलब्ध झाला आहे आणि लेटेस्ट बीटा अपडेट मध्ये एंड्राइड यूजर्स साठी हा फीचर सादर करण्यात आला आहे. पण अजून याची माहिती मिळाली नाही की व्हाट्सॅप एंड्राइड च्या स्टॅण्डर्ड स्टेबल वर्जन मध्ये हा फीचर कधी घेऊन येईल. 
व्हाट्सॅप सर्व छोट्या चुका दूर करण्यासाठी काम करत आहे ज्यामुळे यूजर्सना चांगला अनुभव मिळू शकेल. उदाहरणार्थ, मागच्या महिन्यात कंपनी ने लॉक्ड रिकॉर्डिंग फीचर सादर केला होता ज्यामुळे यूजर्स एक सोप्या जेस्चर ने ऑडियो रेकॉर्डिंग लॉक करू शकतात. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर यूजर ला पाहिजे असल्यास तो रेकॉर्डिंग सेंड करू शकतो किंवा रद्द करू शकतो. 
 
व्हाट्सॅप यूजर्सना खुप वेळेपासून लॉक्ड रेकॉर्डिंग फीचर ची गरज होती आणि आता सेव वॉइस रिकॉर्डिंग फीचर यूजर एक्सपीरियंस अजून चांगला बनवेल. येणार्‍या काही अपडेट्स मध्ये व्हाट्सॅप स्टीकर्स फीचर जारी केला जाऊ शकतो आणि सोबतच लाइव लोकेशन शेयरिंग फीचर मध्ये पण सुधार येईल. 
 
सेव वॉइस रिकॉर्डिंग फीचर च्या एक्सपीरियंस साठी गूगल प्ले स्टोर वर जाऊन गूगल प्ले व्हाट्सॅप बीटा प्रोग्राम मध्ये साइन अप करून व्हाट्सॅप बीटा 2.18.123 अपडेट मिळवता येईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :