Whatsapp आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी एक नवीन फीचर आणणार आहे. या फीचर अंतर्गत, App व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल दरम्यान वापरकर्त्याची गोपनीयता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवेल. ताज्या अहवालानुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म लवकरच ‘Protect IP address in calls’ नावाचे फिचर जोडणार आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर, कोणताही वापरकर्ता तुमचे लोकेशन आणि IP पत्ता ट्रॅक करू शकणार नाही. थोडक्यात कोणीही तुमच्यावर नजर ठेऊ शकणार नाही.
Whatsapp च्या आगामी फीचर्स आणि सर्व ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी साईट म्हणजेच Wabetainfo च्या ताज्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, काही वापरकर्त्यांना TestFlight App मध्ये उपलब्ध iOS 23.23.1.70 अपडेटसाठी लेटेस्ट WhatsApp बीटाद्वारे ‘Protect IP address in calls’ फिचर प्राप्त झाले आहे.
नावावरूनच समजले असेल की, WhatsApp चे हे नवीन फीचर युजर्सच्या IP ऍड्रेसला संरक्षण देईल. रिपोर्टनुसार, हे फीचर चालू झाल्यानंतर इतर कोणीही यूजर्सचे व्हॉट्सऍपवरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल ट्रॅक करू शकणार नाही.
X म्हणजेच ट्विटरवर दिलेल्या पोस्टमध्ये या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, नवीनतम अपडेटनंतर WhatsApp वापरकर्त्यांना प्रायव्हसी विभागात एक नवीन ऍडव्हान्स फिचर मिळेल. या नवीन फिचर द्वारे WhatsApp अतिरिक्त सुरक्षा स्तर प्रदान करेल. या फिचर अंतर्गत, वापरकर्त्यांना ‘Protect IP address in calls’ हा पर्याय दिसेल. या नवीन ऑप्शनसह, माहिती देण्यात आली आहे की, हे फीचर ऑन केल्यानंतर WhatsApp कॉल दरम्यान कोणीही तुमचे लोकेशन शोधू शकणार नाही. हे फिचर ऑन केल्यानंतर, तुमचे कॉल्स देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड राहतील.
अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टमध्ये पुढे आले आहे की, लवकरच एक नवीन AI फीचर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर जोडले जाणार आहे. हे नवीन AI फीचर यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देईल. रिपोर्टनुसार, हे नवीन AI फीचर Contact Us विभागात उपलब्ध असेल. वापरकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे दिली जातील. म्हणजेच हे फिचर युजर्सच्या शंका किंवा समस्यांचे निराकरण करणार आहे.