सुरक्षेसाठी WhatsApp चे महत्त्वाचे पाऊल! कॉलदरम्यान कुणीही तुमची लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही, वाचा सविस्तर
WhatsApp लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन प्रायव्हसी फीचर आणणार आहे.
नवीन फीचरद्वारे तुमच्या IP ऍड्रेस पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहील.
नव्या फीचरद्वारे कॉल दरम्यान तुमचे लोकेशन कुणीही ट्रॅक करू शकणार नाही.
मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीची पूर्णपणे काळजी घेतो. युजर्सच्या याच गरजा लक्षात घेऊन आपल्या प्लॅटफॉर्म नवीन फिचर आणत आहे. ताज्या रिपोर्टनुसार, WhatsApp लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणणार आहे. या नवीन फीचरद्वारे तुमच्या IP ऍड्रेस पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहील, याची काळजी घेतली गेली आहे. याद्वारे WhatsApp कॉल दरम्यान कोणीही तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही.
Protect IP Adress in Calls
WABetaInfo च्या ताज्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp सध्या एका नवीन प्रायव्हसी फिचरवर काम करत आहे. युजर्सने हे फीचर ऑन ठेवल्यास व्हॉट्सऍप कॉल्स दरम्यान यूजर्सच्या IP Adress ला मजबूत प्रोटेक्शन मिळेल. नव्या अपडेटनंतर निवडक युजर्सना हे फिचर प्राप्त झाले आहे.
WhatsApp beta for Android 2.23.18.15: what's new?
WhatsApp is working on a new privacy feature to protect the IP address in calls, and it will be available in a future update of the app!https://t.co/kh3eyXW1sH pic.twitter.com/vPsnfFih6l
— WABetaInfo (@WABetaInfo) August 28, 2023
तुम्ही वरील स्क्रिनशॉटमध्ये बघू शकता, वापरकर्त्यांना 'कॉल' टॅबमधील Silence Unknown Callers पर्यायाच्या अगदी खाली कॉल्समध्ये नवीन Protect IP Adress in Calls पर्याय दिसतोय. आम्ही तुम्हाला सांगतो की, या नवीन ऑप्शनच्या खाली माहिती देण्यात आली आहे की, जर तुम्हाला तुमचे WhatsApp लोकेशन कोणीही ट्रॅक करू नये असे वाटत असेल, तर हे फीचर फक्त तुमच्यासाठी आहे. हे टॉगल ऑन करा आणि तुमचा IP ऍड्रेस सुरक्षित होईल.
Silence Unknown Callers फिचर
नावाप्रमाणेच, हे फिचर अनोळखी नंबरवरून येणारे WhatsApp कॉल्स आपोआप सायलेंट करते. हे फिचर अलीकडेच जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी WhatsApp वर अनेक आंतरराष्ट्रीय नंबरवरून स्पॅम आणि फसवणूक कॉल येत होते. बरेच युजर्स या फसवणुकीला बळी पडले आहेत. अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या कॉल्सपासून मुक्त होण्यासाठी, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने हे नवीन फिचर सादर केले आहे.
येत्या काही दिवसांत WhatsApp Protect IP Adress फीचर देखील सर्व युजर्ससाठी प्रसिद्ध केले जाईल, अशी अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile