भारीच की ! WhatsApp रीडिझाईन करण्याची तयारी सुरु, नव्या लुकसह लवकरच येणार मोठे अपडेट
नव्या अपडेटसह व्हॉट्सऍप रीडिझाइन डेव्हलप करत
व्हॉट्सऍप फ्लोटिंग ऍक्शन बटन्सच्या रीडिझाइनवर काम करत आहे.
कंपनी मटेरियल डिझाइन 3 गाईडलाईन्सनुसार ऍप रीडिझाईन करत आहे.
मेटाच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच नव्या अपडेटसह व्हॉट्सऍप रीडिझाइन डेव्हलप करत आहे. या नवीन अपडेटसह, व्हॉट्सऍप फ्लोटिंग ऍक्शन बटन्सच्या रीडिझाइनवर काम करत आहे. कंपनीने Google Play बीटा प्रोग्रामद्वारे त्याचे नवे वर्जन 2.23.12.15 आणले आहे.
अलीकडेच आलेल्या अपडेटमध्ये, टॉगलसाठी नवीन स्टाईलची घोषणा केली गेली होती. जी मटेरियल डिझाइन 3 गाईडलाईन्सला फॉलो करते. कंपनी मटेरियल डिझाइन 3 गाईडलाईन्सनुसार ऍप रीडिझाईन करत आहे, असे यावरून समजते.
WhatsApp फ्लोटिंग ऍक्शन बटन्स
वृत्तानुसार, WhatsApp फ्लोटिंग ऍक्शन बटन पुन्हा डिझाइन करण्याची योजना आखत आहे. रिपोर्टनुसार, यूजर्स नवीन बटन्सच्या मदतीने नवीन चॅट्स लगेच सुरू करू शकतील. ही रीडिझाइन केलेली बटन्स 'मटेरियल डिझाइन 3' गाईडलाईन्सला फॉलो करतील. अहवालातून असेही समजले आहे की, रीडिझाइन फक्त फ्लोटिंग ऍक्शन बटन्ससाठी मर्यादित राहणार नाही, तर कॉल आणि स्टेटस टॅबवरील बटन्सवर देखील लागू होईल.
संपूर्ण ऍपचे लुक बदलणार
यापूर्वी WhatsApp ने स्क्रीनच्या बॉटमला नेव्हिगेशन बारसह रीडिझाइन केलेला इंटरफेस रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. हा नवीन इंटरफेस सर्वांसाठी रिलीज केला जात आहे. याद्वारे समजते की, कंपनी संपूर्ण ऍप रिडिझाईन करण्याचे प्लॅन करत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile