व्हॉट्सअॅप झाला मोफत, यूजर्ससाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी
व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे की, आता व्हॉट्सअॅपवर वर्षासाठी दिला जाणारा १ डॉलर म्हणजेच 68 रुपये शुल्क हटवले गेले आहे. आता यूजर्सला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
आज जवळपास जगभरात करोडो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करताना दिसतायत. कारण ह्याद्वारे आपण एकमेकांशी जोडलेले राहतो. मात्र त्याचबरोबर आपण ह्यासाठी एका समस्येला नक्कीच सामोरे गेलो, ते म्हणजे १ वर्षानंतर जर आपण ह्याचे वार्षिक शुल्क १ डॉलर म्हणजे ६८ रुपये नाही दिले, तर व्हॉट्सअॅप बंद होत होते. मात्र आता अशी घोषणा करण्यात आली आहे की, ह्यापुढे आपल्याला ह्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आता हा यूजर्ससाठी पुर्णपणे मोफत झाला आहे.
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, “जगभरात अनेक व्हॉट्सअॅप यूजर्सजवळ डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसते. त्यामुळे आपल्या येणा-या काही दिवसात आम्ही आपल्या अॅपचे वेगवेगळे व्हर्जनने हे शुल्क हटवू. आता व्हॉट्सअॅपच्या वापरावर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. ह्याचाच अर्थ असा की, आता व्हॉट्सअॅप एकदम मोफत होणार आहे.”
तथापि, असेही पाहिले गेले की, काही यूजर्सकडून शुल्कही आकारलेही गेले नाही, उलट त्यांना १ वर्षासाठी मोफत सब्सक्रिप्शन दिले गेले. मात्र आता कोणत्याही यूजर्सकडून शुल्क घेतले जाणार नाही.
काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले होते की, सध्यातरी व्हॉट्सअॅपवरुन केवळ टेक्स्ट मेसेजिंग आणि कॉल्स केले जाऊ शकतात. मात्र लवकरच व्हॉट्सअॅपने व्हिडियो कॉलची सुविधा सुद्धा सुरु करणार आहे. ह्याला पुढील वर्षाच्या सुरुवातीला रोलआउट केले जाईल.
जो रिपोर्ट समोर आला आहे, त्यात अशी माहिती दिली आहे की, व्हॉट्सअॅप लवकरच व्हिडियो कॉल सपोर्ट उपलब्ध होईल. जर्मनीच्या एका वेबसाइटने व्हाट्सअॅपच्या आयओएस अॅपचा स्क्रीनशॉट दिला आहे, जो एक प्रकारचा व्हिडियो कॉल आहे.