WhatsApp वर येणार नवे Voice Message Transcripts फिचर! व्हॉईसला टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करणे झाले सोपे
WhatsApp वर युजर्सच्या सोयीसाठी सतत नवनवीन फीचर्स येत असतात.
WhatsApp ने नवीन Voice Message Transcripts फीचर सादर
हे फिचर iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
WhatsApp वर युजर्सच्या सोयीसाठी सतत नवनवीन फीचर्स सादर केले जातात. दरम्यान, संभाषणे आणखी सुलभ करण्यासाठी WhatsApp ने नवीन Voice Message Transcripts फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉइसचे टेक्स्टमध्ये सहज रूपांतर करता येईल. मार्क झुकेरबर्गने लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या या नवीन वैशिष्ट्याची घोषणा केली आहे. हे फिचर अशा लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे, जे घाईत असतात आणि टेक्स्ट लिहत बसू शकत नाही.
Also Read: Black Friday Sale 2024: प्रसिद्ध Samsung कंपनीच्या प्रोडक्ट्सवर मिळतोय भारी Discount, पहा ऑफर्स
WhatsApp Voice Message Transcripts
लोकप्रिय WhatsApp च्या ब्लॉग पोस्टनुसार, व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर व्हॉइस मेसेजला टेक्स्टमध्ये ट्रान्स्क्राइब करू शकते. जेणेकरून तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्ही संभाषण सहज सुरू ठेवण्यास सक्षम असाल. तुमच्या डिव्हाइसवर ट्रान्स्क्रिप्ट जनरेट केले जातात, जेणेकरून इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील तुमचे पर्सनल मॅसेज ऐकू किंवा वाचू शकत नाही.
हे फिचर येत्या आठवड्यात निवडक भाषांसाठी समर्थनासह जागतिक स्तरावर आणले जात आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत याला आणखी अनेक भाषांसाठी समर्थन मिळणार आहे. सुरुवातीला हे फिचर इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि रशियन या फक्त चार भाषांना सपोर्ट करेल. त्याबरोबरच, हे फिचर iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे फिचर लवकरच तुमच्या खात्यासाठी देखील उपलब्ध होईल.
Message Transcripts कसे ऑन करावे?
- हे फीचर सुरू करण्यासाठी यूजर्सला आधी WhatsApp च्या Setting मध्ये जावे लागेल.
- आता चॅट्स वर जा. येथे तुम्हाला Voice Message Transcripts चा पर्याय मिळेल.
- येथून ते ऑन आणि ऑफ केले जाऊ शकते. व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स ऑन करताना, तुम्हाला भाषा निवडावी लागेल.
- तुम्ही मेसेजवर जास्त लॉन्ग प्रेस करून, नंतर ‘ट्रान्सक्राइब’ वर टॅप करून व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्राइब करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile