सिक्योरिटीसाठी Whatsappचे मोठे पाऊल ! मॅसेज वाचताचं आपोआप होतील डिलीट, येणार नवीन फिचर

सिक्योरिटीसाठी Whatsappचे मोठे पाऊल ! मॅसेज वाचताचं आपोआप होतील डिलीट, येणार नवीन फिचर
HIGHLIGHTS

WhatsApp वर टेक्सटासाठी View-Once फिचर

तुमचे मॅसेज वाचल्यानंतर आपोआप डिलीट होतील.

नव्या फीचरची बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरु

WhatsApp वेळोवेळी नवीन फीचर्ससह वापरकर्त्याच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची काळजी घेतो. व्हॉट्सऍप आता एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर येताच यूजर्स व्ह्यू वन्स मेसेज पाठवू शकतील. म्हणजेच मेसेज वाचल्यानंतर तो मेसेज आपोआप डिलीट होईल. या फीचरला 'व्ह्यू वन्स' पर्याय म्हटले जाईल. सध्या त्याची चाचणी बीटा आवृत्तीवर सुरू आहे. 

हे सुद्धा वाचा : 'या' चुका अजिबात करू नका, अन्यथा तुमचा फोन ब्लास्ट होण्याची वाढेल शक्यता…

टेक्स्ट प्रायव्हसीसाठी WhatsApp View-Once फिचर 

टेक्स्ट प्रायव्हसीसाठी WhatsApp View-Once फिचर आणले जाईल. हे वैशिष्ट्य संदेश कॉपी करण्यास प्रतिबंध करेल. मेसेज एकदा पाहिल्यानंतर वापरकर्ता प्रिंट शॉट देखील घेऊ शकणार नाही. हे नवीन फीचर व्हॉट्सऍप बीटा 2.22.25.20 वर दिसले आहे.

असेच एक फीचर व्हॉट्सऍपवर आधीपासूनच आहे, पण ते फक्त फोटो आणि व्हिडिओंसाठी आहे. हे फिचर अद्याप मजकूर संदेशांमध्ये उपलब्ध नाही. या बाबतीत व्हॉट्सऍप आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप मागे आहे. स्नॅपचॅट सारख्या ऍप्सवर हे फिचर आधीपासूनच उपलब्ध आहे.

बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरु 

प्लॅटफॉर्ममध्ये आधीपासूनच एक फिचर आहे, ज्यामुळे संदेश मर्यादित कालावधीनंतर अदृश्य होतात. हे फिचर वैयक्तिक आणि गट दोन्हीमध्ये उपलब्ध असेल. वापरकर्त्याच्या पसंतीनुसार संदेशांना 24 तासांपासून 90 दिवसांपर्यंत अदृश्य होण्यास अनुमती देते. व्ह्यू वन्स फीचर सुरू होताच मेसेज लगेच गायब होतील. मेसेज पाठवताना तुम्हाला फक्त व्यू वन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही सुविधा येताच गोपनीयता आणि सुरक्षितता आणखी वाढेल. सध्या बीटा आवृत्तीवर चाचणी सुरू आहे आणि ती लवकरच सर्वांसाठी आणली जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo