WhatsApp Update: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर स्टेटस अपडेटसाठी येतोय नवा फिचर, मिळेल जास्त प्रायव्हसी। Tech News

Updated on 22-May-2024
HIGHLIGHTS

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे.

WhatsApp लवकरच View Mentions फीचर रिलीज करणार आहे.

नवे फिचर ॲपच्या भविष्यातील अपडेटमध्ये प्रसिद्ध केले जाईल.

सध्या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. कंपनी स्टेटस अपडेट्समध्ये खाजगी उल्लेखाची म्हणजेच मेन्शनची सुविधा आणण्यावर काम करत आहे. दरम्यान, ताज्या वृत्तानुसार, मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp हे फिचर आणखी चांगले बनवण्यासाठी स्टेटस अपडेट्सवर नमूद केलेल्या लोकांना पाहण्याची सुविधा देण्यावर काम करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आगामी फीचरबद्दल जाणून घेऊयात-

हे सुद्धा वाचा: Tips: श्श! तुमच्या फोनमध्ये सुद्धा ‘हे’ बदल दिसत आहेत का? लगेच व्हा सतर्क, अन्यथा होईल मोठे नुकसान। Tech News

WhatsApp चे View Mentions फीचर

WhatsApp च्या आगामी फिचरवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइट WABetainfo ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, कंपनी मेन्शन्स पाहण्याची सुविधा आणण्यावर काम करत आहे. Google Play Store वर उपलब्ध WhatsApp Beta च्या नवीनतम अपडेटवरून हे उघड झाले आहे की, WhatsApp वापरकर्त्यांना स्टेटस अपडेट्समध्ये ‘Mension’ केलेल्या लोकांना पाहण्याची परवानगी देईल. सध्या, हे फिचर डेव्हलपमेन्ट फेजमध्ये आहे. हे फिचर भविष्यातील अपडेट्ससह सर्व वापरकर्त्यांसाठी सादर केले जाईल.

‘अशा’ प्रकारे नवे फिचर कार्य करेल

वरील पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रिनशॉटननुसार WhatsApp सध्या लोकांना स्टेटस अपडेट्समध्ये ‘Mension’ केल्यावर सूचित करण्यासाठी नवीन इंटरफेसवर काम करत आहे. नवे फिचर ॲपच्या भविष्यातील अपडेटमध्ये प्रसिद्ध केले जाईल. स्टेटस अपडेटद्वारे एखाद्याला केलेला उल्लेख नेहमीच खाजगी राहील. म्हणजेच इतर वापरकर्ते स्टेटस अपडेटमध्ये कोणत्या संपर्काचा उल्लेख आहे, हे अजिबात बघू शकणार नाहीत.

whatsapp new feature 2024

ज्या लोकांना Mension करण्यात आले आहे, केवळ त्यांनाच याबद्दल माहिती होईल. त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही मेन्शन केलेल्या संपर्काबद्दल कळणार नाही. लक्षात घ्या की, हे फिचर अद्याप विकासाच्या टप्प्यातच आहे. हे भविष्यातील अपडेट्ससह प्रसिद्ध केले जाईल. टेस्टिंगमध्ये प्रथम बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणले जाईल. त्यानंतर, अवघ्या काही कालावधीतच हे फिचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :