WhatsApp New Update: मेसेजिंग App वर येतोय अप्रतिम फीचर, आता 2GB पर्यंत फाइल्स शेअर करणे झाले सोपे। Tech News

Updated on 23-Jan-2024
HIGHLIGHTS

WhatsApp वर येणार एक लोकप्रिय आणि महत्त्वाचे फीचर

नवे फिचर Android च्या 'Nearby Share' फिचरसारखे काम करेल.

वापरकर्ते 2GB पर्यंतच्या फाईल्स सहज शेअर करू शकतील.

WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या फीचरद्वारे वापरकर्त्यांना जवळपासच्या लोकांसोबत सहजपणे फाइल शेअर करण्यात मदत करेल. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे हे फाइल-शेअरिंग फिचर Android च्या ‘Nearby Share’ फिचरसारखे आहे. मात्र, यासाठी वापरकर्त्यांना एकमेकांच्या जवळ असणे आवश्यक आहे.

WhatsApp चे फाइल शेअरिंग फिचर

WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार आगामी फाइल-शेअरिंग फिचर सध्या Android 2.24.2.17 साठी WhatsApp बीटा वर उपलब्ध आहे. या फीचरद्वारे फाइल्स पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरकर्त्यांना एक नवीन सेक्शन उघडावा लागेल. वापरकर्ते 2GB पर्यंतच्या फाईल्स शेअर करू शकतील.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या फिचरमुळे वापरकर्त्यांना शेअर रिक्वेस्ट जनरेट करण्यासाठी त्यांचे डिव्हाइस हलवावे लागेल आणि केवळ त्यांच्या संपर्क सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या वापरकर्त्यांना पाठवल्या जाऊ शकतात. टेक्स्ट मॅसेजेस आणि WhatsApp कॉल्सप्रमाणेच, फाईल शेअरिंग देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केले जाऊ शकते. हे फिचर Android च्या ‘नियर बाय शेअर’ फिचरसारखेच आहे. परंतु एन्हान्स्ड एन्क्रिप्शनसह फोन तुमच्या संपर्क सूचीमध्ये नसलेल्या लोकांपासून लपविला जातो.

अहवालाद्वारे हे समोर आले आहे की, WhatsApp चे फाइल शेअर फिचर सध्या विकसित होत आहे. नवे फिचर App च्या भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होणार असलायची शक्यता आहे. परंतु ते ऍपच्या स्थिर आवृत्तीवर कधी उपलब्ध होईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :