WhatsApp New Update: आता चॅटमधील Important मॅसेज पिन करा, इतर नवे आणि महत्त्वाचे फीचर्स लाँच। Tech News
WhatsApp ने आपल्या iOS वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणले.
व्ह्यू वन्स फिचर सध्या तुम्हाला फक्त फोटो आणि व्हिडीओज अंतर्गत मिळतो.
वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल दरम्यान कनेक्शनची हेल्थ तपासण्याची सुविधा मिळेल.
WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी विविध नवीन फीचर्स आणले आहेत. लेटेस्ट अपडेटद्वारे, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आपल्या iOS वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणले. यामध्ये मेसेज पिन करणे, व्हिडिओ कॉल दरम्यान ‘कनेक्शन हेल्थ फिचर’ आणि व्हॉइस मेसेजमध्ये व्ह्यू वन्स इ फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
लक्षात घ्या की, हे अपडेट सध्या फक्त iOS वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठीही आणले जाईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
WhatsApp चे नवे फीचर्स
Wabetainfo च्या ताज्या अहवालानुसार, WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटमध्ये iOS वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स जारी करण्यात आली आहेत. खालील रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या नवीन फीचर्सची यादी देण्यात आली आहे.
Video Call Connection Health
या फिचरबाबत बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांचे कनेक्शन तपासण्याची सुविधा मिळेल. यासाठी त्यांना व्हिडीओ कॉल दरम्यान फक्त त्यांच्या टायटलवर दीर्घकाळ दाबून ठेवावे लागेल. यानंतर तुम्हाला रिअल टाइम व्हिडिओ कॉलिटी कनेक्शन तपशील मिळतील.
Pin Messages
WhatsApp वापरकर्ते आता ग्रुप चॅटमध्ये कोणताही एक मेसेज पिन करू शकतील. आतापर्यंत हे फिचर चॅट पिन करण्यासाठी उपलब्ध होते, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे आणि आवडते चॅट प्रोफाइलच्या टॉपवर पिन करून ठेवू शकतात. तसेच, आता युजर्सना ग्रुप चॅटमध्ये मॅसेज पिन करण्याची सुविधा मिळणार आहे. ग्रुपमध्ये उपस्थित असलेले सर्व सदस्य हा पिन मेसेज पाहू शकतील.
View Once
WhatsApp ने तिसऱ्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्ह्यू वन्स फिचर सध्या तुम्हाला फक्त फोटो आणि व्हिडीओज अंतर्गत मिळतो. तर, नवीनतम अपडेटनंतर आता व्हॉट्सऍप iOS वापरकर्ते व्ह्यू वन्स ऑप्शनसह इतर व्यक्तीला ऑडिओ/व्हॉइस मॅसेज देखील पाठवू शकतात.
टीप: जर iOS वापरकर्त्यांना हे फिचर अजूनही मिळाले नसेल तर तुम्हाला तुमचे WhatsApp अपडेट करावे लागेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile