WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी ऍप आणखी उपयुक्त बनवण्यासाठी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स जारी करत असतात. आता WhatsApp ने एक अपडेट जारी केले आहे. अपडेटसह इन्स्टंट मेसेजिंग ऍपमध्ये अनेक नवीन फीचर्स सादर करण्यात आली आहेत. नव्या फीचर्ससह वापरकर्ते आता कोणतेही मीडिया म्हणजे फोटो आणि व्हिडिओ ओरिजनल कॉलिटी फाइल म्हणून शेअर करू शकतील. हे फिचर iOS साठी जागतिक स्तरावर जारी केलेल्या नवीन अपडेटसह सादर केले गेले आहे. चला तर मग नव्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती बघुयात.
WABetainfo च्या ताज्या अहवालानुसार नव्या अपडेटसह, वापरकर्त्यांना जागतिक स्तरावर अनेक नवीन फीचर्स मिळत आहेत. या अपडेटसह आलेल्या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही आता WhatsApp द्वारे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या ओरिजनल कॉलिटीमध्ये शेअर करण्यास सक्षम असणार आहात. एवढेच नाही तर, अधिकृत चेंजलॉग म्हणतो की, WhatsApp सर्वांना कॉल न करता मोठ्या ग्रुपमध्ये व्हॉइस चॅट सुरू करण्यासाठी देखील फिचर जारी करत आहे.
याशिवाय, कंपनी आता चॅटमध्ये नवीन बबल आणत आहे, असे देखील सांगितले जात आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते मिस्ड, सुरु आणि पूर्ण झालेल्या कॉल्सची हिस्ट्री पाहण्यास सक्षम असतील. त्याबरोबरच, तुमचा अवतार वापरून स्टेटस अपडेट्सवर प्रतिक्रिया देण्याची सुविधा देखील मिळणार आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, WhatsApp मीडिया मूळ कॉलिटीमध्ये पाठवण्यासाठी डॉक्युमेंट्सचा वापर करता येईल, असे फिचर जारी करण्यात आले आहे. हे फिचर तुम्ही पुढीलप्रमाणे वापरू शकता.
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट शेअर शीट ओपन करावी लागेल. त्यानंतर मेसेज बारच्या डाव्या बाजूला दिलेल्या + आयकॉनवर क्लिक करा. नंतर डॉक्युमेंट्स सेक्शन ओपन करा. आता येथे तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओचा पर्याय निवडावा लागेल. येथून निवडलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यावर ते ओरिजनल कॉलिटीमध्ये शेअर केले जातील.
हे फिचर जर तुम्हाला मिळाले नसेल तर लवकरच तुम्हाला येत्या काही दिवसात या फिचरचा ऍक्सेस मिळणार आहे. या फीचरसाठी तुम्हाला App स्टोअरवरून WhatsApp चे नवीनतम अपडेट इन्स्टॉल करावे लागेल.