WhatsApp ने अँड्रॉइड युजर्ससाठी अनेक फिचर्स सादर केले आहेत. ऍप आपल्या युजर्सची प्रायव्हसीची नेहमीच काळजी घेत असते. नवीन अपडेटसह, वापरकर्त्यांना अनेक प्रायव्हसी फीचर्स मिळणार आहेत. नव्या अपडेटनंतर स्क्रीनच्या बॉटमला नेव्हिगेशन बार तुम्हाला दिसणार आहे. नवीन अपडेट सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.
युजर इंटरफेसबाबतचा अहवाल अलीकडेच पुढे आला होता. आता तो हळूहळू बीटा वापरकर्त्यांसाठी आणला आहे. नवीन अपडेटनंतर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल सायलेंट करता येतील. याबाबत माहिती WABetaInfo ने दिली आहे.
– अनोळखी नंबरवरून येणारे कॉल सायलेंट करण्यासाठी सेटिंग्ज > प्रायव्हसी वर जा.
– त्यानंतर स्पॅम नंबरचा पर्याय निवडावा लागेल.
– या सेटिंगनंतरही, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल कॉल लॉगमध्ये दिसतील.
या नवीन फिचरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना व्हॉट्सऍप अपडेट करावे लागेल. नव्या अपडेटनंतर अँड्रॉईड ऍपचा इंटरफेसही iPhoneसारखा असणार आहे. त्यात नेव्हिगेशन बटन बॉटमला दिसेल.
व्हॉट्सऍपच्या नव्या अपडेटमध्ये सिंगल व्होट पोलचे फीचरही येणार आहे. ज्यानंतर युजर्सनी पोलमध्ये मत दिल्यावर त्यांचे उत्तर बदलता येणार नाही. मात्र, हा नवा अपडेट कधी प्रत्येकासाठी कधी जारी होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.