WhatsApp Update: आता लवकरच स्वतःच ट्रान्सलेट होतील मॅसेजेस, लवकरच येतोय महत्त्वाचे नवा फिचर!

Updated on 12-Dec-2024
HIGHLIGHTS

WhatsApp आपल्या युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स लवकरच सादर करणार

WhatsApp वर लवकरच नवे ट्रान्सलेट मॅसेजेस अँड अपडेट फीचर येणार

WhatsApp फीचर्स आणि ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाईटच्या रिपोर्टमधून मिळाली माहिती

WhatsApp Update: WhatsaApp आपल्या युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स लवकरच सादर करणार आहे. नव्या फीचर्सद्वारे ते येणाऱ्या काळात चॅटमधील मेसेजेसचे कोणत्याही भाषेत सहज ट्रान्सलेशन करू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp ची ही नवी सुविधा आल्याने भाषिक अडथळे दूर होऊन संवाद साधणे सोपे होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या भाषिक मित्रासोबत संवाद करण्यास अडचणी येत असतील, तर हे फिचर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Also Read: Finally! बहुप्रतीक्षित Vivo X200 सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स

WhatsaApp ट्रान्सलेट मॅसेजेस अँड अपडेट फीचर

WhatsaApp च्या नव्या ट्रान्सलेट मॅसेजेस अँड अपडेट फीचरबद्दल WhatsaApp फीचर्स आणि ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाईटच्या रिपोर्टमधून माहिती मिळाली आहे. होय, Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.26.9 बीटा अपडेटवरून असे दिसून आले की, ऍप Google Translate फीचरवर काम करत आहे. ज्याद्वारे संदेश आणि चॅनेल अपडेट्स तुमच्या स्वतःच्या भाषेत ट्रान्सलेट केले जाऊ शकतात. या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट दिला गेला आहे.

वरील पोस्टमधील स्क्रिनशॉट पाहिल्यास WhatsaApp च्या मेसेजिंग ॲपमध्ये एक विंडो दिसते, ज्यामध्ये ट्रान्सलेशनचा पर्याय दिसेल. या फिचरच्या मदतीने, चॅट मॅसेज आणि चॅनेल अपडेट्स इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट करता येतील. यासोबतच, ऑटो ट्रान्सलेशनचा पर्याय देखील मिळणार आहे. जो ऑन केल्यानंतर मॅसेज आणि अपडेट्स आपोआप ट्रान्सलेट होतील.

याव्यतिरिक्त, हे फिचर तुमच्या गोपनियतेची देखील काळजी घेणार आहे. अहवालात पुढे सांगण्यात आले आहे की, ही प्रक्रिया अशा प्रकारे होईल, जेणेकरून वापरकर्त्यांचा डेटा कोणत्याही थर्ड पार्टी किंवा इतर सर्व्हरवर संग्रहित केला जाणार नाही. तसेच, युजर्सच्या चॅट्स देखील कधीही लीक होणार नाहीत. सध्या या फीचरवर काम सुरू असून येत्या काही दिवसांत हे फीचर बीटा युजर्ससाठी ट्रायल म्हणून रिलीज केले जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :