WhatsApp वर चॅटिंग होईल आणखी मजेशीर, लवकरच येणार नवे आणि Attractive थीम फिचर। Tech News
WhatsApp ने अपडेटसह Android आणि iOS या दोन्ही ॲप्सचे डिझाइन बदलले.
आता बऱ्याच प्रमाणात दोन्ही ॲप्सचा UI सारखा दिसत आहे.
WhatsApp आता एका नव्या थीम फिचरवर काम करत आहे.
WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत काही ना काही अपडेट आणत असतो. बऱ्याच काळापासून WhatsApp युजर्स एकाच थीमसह चॅटिंग करत आहेत. त्यामुळे, आता इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने iOS ॲपसाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. अलिडकेच, कंपनीने अपडेटसह Android आणि iOS या दोन्ही ॲप्सचे डिझाइन बदलले. डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल केल्यानंतर मेटा-मालकीचे WhatsApp आता नवे थीम फिचर आणण्यासाठी काम करत आहे.
हे सुद्धा वाचा: Infinix GT 20 Pro ची किंमत लाँचपूर्वीच Confirm! आतापर्यंतचा सर्वात Powerful गेमिंग फोन। Tech News
WhatsApp चे आगामी थीम फिचर
WhatsApp च्या आगामी फीचर्स आणि ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी वेबसाइट Wabetainfo ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टद्वारे माहिती मिळाली आहे की, कंपनी एका थीम फिचरवर काम करत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना चॅट बबल कलर कस्टमाइज करता येतील. चॅट बबलच्या नव्या कलरमुळे चॅटिंग करण्याचा अनुभवच बदलेल.
वरील पोस्टमध्ये एक स्क्रिनशॉट शेअर केले गेले आहे. यावरून कळते की, कंपनी यूजर्सना चॅट बबलचा कलर कस्टमाईज करण्याचा पर्याय देईल. मात्र लक्षात घ्या की, स्क्रीनशॉटमध्ये दाखवलेला निळा रंग अधिकृत नाही, कारण तो Wabetainfo च्या टेस्टिंगचा भाग आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp सक्रियपणे हिरव्या व्यतिरिक्त रंग निवडण्याचा पर्याय प्रदान करण्यासाठी काम करत आहे. हे फिचर भविष्यातील अपडेट्ससह बीटा वापरकर्त्यांसाठी टेस्टिंगसाठी रिलीज केले जाईल. यशस्वी टेस्टिंगनंतर सर्व iOS वापरकर्ते फिचर वापरण्यास सक्षम असतील.
WhatsApp चे नवे डिझाईन
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने अपडेटसह Android आणि iOS या दोन्ही ॲप्सचे डिझाइन बदलले आहे. आता बऱ्याच प्रमाणात दोन्ही ॲप्सचा UI सारखा दिसत आहे. डिझाइन बदलांसाठी सेक्शन्समध्ये स्विच करणे सोपे झाले आहे. वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्ये चॅट्स सहजपणे शोधण्यासाठी फिल्टर देखील मिळतात. यासह अनेक आकर्षक फीचर्स भविष्यातील अपडेट्ससह प्रसिद्ध केले जातील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile