Whatsapp वर येणार अप्रतिम फीचर ! आता GIF देखील होणार एडिट, वाचा डिटेल्स
WhatsApp वर येणार न्यू टेक्स्ट एडिटिंग फीचर
फोटो, व्हीडिओसह GIF मध्ये देखील टेक्स्ट एडिट करता येतील.
WhatsApp स्पॅम कॉल्स सायलेंट करण्यासाठी देखील फिचर येणार आहे.
इन्स्टंट मेसेजिंग ऍप Whatsapp वापरकर्त्यांच्या सोयीसाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. या एपिसोडमध्ये, व्हॉट्सऍप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे ड्रॉईंग टूलमध्ये अधिक पर्याय आणेल. या टूलच्या मदतीने यूजर्सना टेक्स्ट एडिट करण्यासाठी नवीन सुविधा मिळणार आहेत. हे फीचर्स iOS उपकरणांमध्ये नवीनतम बीटा चाचणी दरम्यान दिसले आहे. तसेच, स्पॅम कॉल्स सायलेंट करण्यासाठी देखील नवीन फीचरवर काम सुरु आहे.
हे सुद्धा वाचा : iPhone लव्हर्स ! Apple iPhone 14 च्या 'या' व्हेरिएंटवर मोठी सूट, लिमिटेड टाइम ऑफर
न्यू टेक्स्ट एडिटिंग फीचर
WABetaInfo ने या फीचरची माहिती दिली आहे. फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार, WhatsApp एका नवीन टेक्स्ट एडिटर फिचरवर काम करत आहे, जे ड्रॉईंग टूलमध्ये नवीन फॉन्ट आणि टेक्स्ट फॉरमॅटिंग आणेल.
या फिचरच्या मदतीने कीबोर्डवरील उपलब्ध पर्यायांवर टॅप करून फॉन्ट निवडणे खूप सोपे होईल. तर, मजकूराचे अलाइनमेंट बदलण्याबरोबरच, वापरकर्त्यांना फोटो, व्हिडिओ आणि GIF मध्ये टेक्स्ट एडिट करण्याची सुविधा देखील मिळेल. याव्यतिरिक्त, युजर्स कंटेंटचे बॅकग्राउंड कलर देखील बदलण्यास सक्षम असतील.
टेस्टफ्लाइट प्रोग्रामद्वारे iOS 23.5.0.72 अपडेटसाठी व्हाट्सएप बीटावर हे फिचर विकसित करताना दिसून आले. मात्र, याक्षणी बीटा परीक्षक टेक्स्ट टूल्स वापरण्यास सक्षम होणार नाहीत, कारण ते अद्याप विकसनशील टप्प्यात आहे. चाचणीनंतर लवकरच हे फिचर जारी करण्यात येईल.
WhatsApp वर 21 नवीन इमोजींची चाचणी
WhatsApp आता 21 नवीन इमोजींची टेस्टींग करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, ऍपच्या नवीन 21 इमोजींची चाचणी सध्या बीटा व्हर्जनवर केली जात आहे. व्हॉट्सऍपने बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सऍप कीबोर्डची नवीन आवृत्ती जारी केली आहे, ज्यामध्ये 21 नवीन इमोजी जोडल्या गेल्या आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile