WhatsApp : आता तूम्ही स्वतःच तयार करा स्टिकर्स ! क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी हेच खरे फिचर
WhatsApp स्टिकर मेकिंग फिचर
WhatsApp आधीपासून वेब आणि डेस्कटॉपवर समान उपकरणांसह उपलब्ध आहे.
WhatsApp ने नव्याने सादर केलेले फीचर्स
फेसबुकच्या मालकीचे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आता त्याच्या फीचर्समध्ये एक अतिशय उपयुक्त नवीन फीचर समाविष्ट केले आहे. हे फीचर एक स्टिकर मेकिंग फिचर आहे. आजकाल अनेक वेळा स्टिकर्सद्वारे काही शब्द न बोलता व्यक्त करणे सामान्य झाले आहे. WhatsApp एका स्टिकर मेकर टूल जो सध्या वापरकर्त्यांना iOS ॲपवर स्टिकर्स तयार करण्यास अनुमती देतो, त्यावर काम करत आहे.
WhatsApp स्टिकर मेकिंग फिचर
WhatsApp beta for iOS 23.10.0.74: what's new?
WhatsApp is working on another feature to create stickers right within the app, and it will be available in a future update!https://t.co/Ki9dvK5WGj pic.twitter.com/GvuC12Exjj
— WABetaInfo (@WABetaInfo) May 20, 2023
हे फिचर वापरकर्त्यांना त्यांच्या लायब्ररीमधून फोटो निवडण्याची आणि बॅकग्राउंड काढण्यासाठी किंवा इतर काही क्रिएटिव्हिटी करण्यासाठी टूल्ससह एडिट करण्यास अनुमती देते. त्याबरोबरच, नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना थर्ड पार्टी ऍप्सची देखील गरज उरणार नाही. अहवालात असे म्हटले आहे की, WhatsApp आधीपासून वेब आणि डेस्कटॉपवर समान उपकरणांसह उपलब्ध आहे.
WhatsApp ने नव्याने सादर केलेले फीचर्स
WhatsApp ने अलीकडेच मतदानासाठी तीन फीचर्स अपडेट केले आहेत. सिंगल व्होट पोल तयार करणे, चॅटमध्ये पोल सर्च आणि पोल अपडेट्सवर नोटिफिकेशन असे हे फीचर्स आहेत. तसेच, तुम्ही आता तुमचे वैयक्तिक चॅट्स देखील लॉक करू शकता. त्याबरोबरच, तुम्ही मीडियासह कॅप्शन जोडून देखील फॉरवर्ड करू शकता. WhatsApp सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्सची सुविधा उपलब्ध करून देतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile