WhatsApp: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आकर्षक फिचर दाखल! आता स्टेटस अपडेट्स होणार आणखी मजेशीर

Updated on 19-Sep-2024
HIGHLIGHTS

लोकप्रिय WhatsApp आता Instagram सारखे फीचर रोल आउट करत आहे.

WhatsApp वर लवकरच Status Update Mention फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिला जाईल.

WABetainfo या वेबसाइटने आपल्या ताज्या अहवालात नव्या फिचरबद्दल माहिती दिली.

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp दररोज युजर्सच्या सोयीसाठी सतत अनेक फीचर्स रोलआऊट करतो. आता प्लॅटफॉर्मने यूजर्ससाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. लोकप्रिय WhatsApp आता Instagram सारखे फीचर रोल आउट करत आहे. होय, WhatsApp वर लवकरच Status Update Mention फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिला जाईल. कंपनी अनेक दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे. आता अखेर तो रोलआऊट करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता नव्या फिचरबद्दल सविस्तर माहिती बघुयात-

Also Read: Vodafone Idea प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे? पहा अगदी सोपी प्रक्रिया

WhatsApp Status Update Mention फिचर

WhatsApp च्या नव्या अपडेटसाठी नवे फिचर आणले जात आहे. WhatsApp च्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने आपल्या ताज्या अहवालात नव्या फिचरबद्दल माहिती देण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमधील स्क्रीनशॉट पाहू शकता. हे फिचर त्यात स्पष्टपणे दिसत आहे. स्टेटस अपडेट पेजवर कॅप्शन बारवर तुम्हाला मेन्शन करण्याचा पर्याय दिला गेला आहे.

या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या संपर्क यादीतील म्हणजेच कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणाचाही उल्लेख करू शकता. यानंतर, तुम्ही ज्या कॉन्टॅक्टचा उल्लेख केला आहे, तो तुमच्या स्टेटसवर नावाच्या खाली दिसेल. हे ऑप्शन तुम्हाला स्टेटस अपडेट करण्यापूर्वी दिसणार आहे. हे वापरकर्त्यांना ते वर्णन करू इच्छित असलेले संपर्क निवडण्यास मदत करेल.

तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एखाद्या संपर्काचा उल्लेख केल्यास, तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये त्यांचा उल्लेख केल्याची सूचना देखील त्यांना मिळेल. याव्यतिरिक्त, त्यांना त्यांच्या चॅट्समध्ये एक मॅसेज देखील मिळेल, ज्यात त्यांना सूचित केले जाईल की, त्यांचा स्टेटस अपडेटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हे नवे फीचर्स अगदी Instagram सारखे आहे.

नवे फिचर सध्या निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी रोल आउट केले जात आहे. येत्या काळात ते सर्वांसाठी स्थिर आवृत्तीवर आणले जाईल. Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.20.3 अपडेटसाठी नवीनतम WhatsApp बीटा स्टेटस अपडेट फिचर सादर केले जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :