WhatsApp Update: नवे Speaker Spotlight फीचर लाँच आणि व्हीडिओ कॉलिंगसाठीही आले अपडेट 

 WhatsApp Update: नवे Speaker Spotlight फीचर लाँच आणि व्हीडिओ कॉलिंगसाठीही आले अपडेट 
HIGHLIGHTS

WhatsApp ने नव्या अपडेटमध्ये अनेक महत्त्वाचे फिचर सादर केले आहेत.

WhatsApp च्या व्हिडिओ कॉल दरम्यान आता तुम्ही तब्बल 32 लोकांना जोडू शकता.

WhatsApp ने सर्वात वेगळे आणि विशेष फिचर 'Speaker Spotlight' देखील आणले आहे.

WhatsApp Update: WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी अलीकडेच काही नवीन अपग्रेड जारी केले आहेत. या नव्या अपडेटद्वारे WhatsApp वापरण्याचा अनुभव आणखी वाढेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, कॉलिंग अनुभव नेहमीपेक्षा अधिक चांगले झाले आहे. नवीन अपडेटनंतर आता यूजर्स कॉल दरम्यान ऑडिओसह स्क्रीन शेअर करू शकतील. एवढेच नाही तर, WhatsApp ने नवीन स्पीकर स्पॉटलाइट फीचरही सादर केले आहे. चला तर मग WhatsApp च्या नव्या अपडेट आणि नव्या फिचरबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp ने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे नवीन कॉलिंग फीचरची माहिती दिली आहे. हे फीचर प्रत्येक WhatsApp प्लॅटफॉर्मवर, डेस्कटॉपपासून मोबाइलपर्यंत सर्वत्र उपलब्ध असणार आहे.

नवे WhatsApp Update

WhatsApp च्या नव्या अपडेटसह Screen sharing with audio फिचरबद्दल झाले तर, आता यूजर्स केवळ स्क्रीनच नाही तर कॉल दरम्यान स्क्रीनसह ऑडिओही शेअर करू शकतील. दरम्यान, व्हॉट्सॲपवर आतापर्यंत फक्त स्क्रीन शेअरचा पर्याय उपलब्ध होता. त्याबरोबरच, व्हिडिओ कॉल दरम्यान WhatsApp वर सामील होणाऱ्या सदस्यांची संख्याही वाढली आहे. आता WhatsApp च्या व्हिडिओ कॉल दरम्यान तुम्ही तब्बल 32 लोकांना जोडू शकता.

WhatsApp brings new features for better calling experience: Screen sharing with audio & more

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, WhatsApp ने 2015 मध्ये आपल्या वापरकर्त्यांसाठी कॉलिंग फीचर लाँच केले. तेव्हापासून या फिचरचे अनेक अपग्रेड्स रिलीज केले गेले आहेत. नॉर्मल कॉलिंगनंतर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरू करण्यात आले. यानंतर ग्रुप कॉलिंगची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. आता नवनवीन अपडेट्सनुसार ग्रुप व्हिडिओ कॉल दरम्यान सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

Speaker Spotlight

WhatsApp ने सर्वात वेगळे आणि विशेष फिचर ‘Speaker Spotlight’ देखील आणले आहे. या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, जेव्हाही तुम्ही व्हॉट्सॲप कॉल दरम्यान कोणाशी बोलत असता आणि दुसऱ्या व्यक्तीने तुमचा कॉल स्पीकरवर ठेवला असेल, तेव्हा स्पीकरचा स्पॉटलाइट तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागतो. हे अतिशय महत्त्वाचे फीचर WhatsApp ने युजर्ससाठी सादर केले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo