WhatsApp आपल्या वापरकर्त्यांची गोपनीयता राखण्यासाठी सतत नवीन सिक्योरिटी फीचर्स आणत असतो. व्हॉट्सऍपने अलीकडेच वेब वापरकर्त्यांसाठी अलीकडेच चॅट लॉक फिचरची चाचणी टेस्टिंग सुरु केली. त्यानंतर, आता मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन सुरक्षा फीचर आणणार आहे. ज्यामुळे कोणीही तुमच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. या फीचरचा सपोर्ट सर्वप्रथम अँड्रॉइड यूजर्सना मिळणार आहे. सविस्तर माहिती बघुयात-
हे सुद्धा वाचा: Amazing! Samsung चा ‘हा’ फोल्डेबल फोन 25,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किमतीसह हजारोंची होणार बचत। Tech News
WhatsApp च्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर शोधले आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, नवा अपडेट रिलीज झाला आहे. या अपडेटअंतर्गत काही बीटा वापरकर्त्यांसाठी नवीन सिक्योरिटी फीचर्स उपलब्ध होऊ लागले आहे.
वरील रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की, प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेतल्यावर एक सूचना प्राप्त होते. ज्यामध्ये ‘Can’t take screenshot due to app restriction’ असे लिहिले आहे. या फीचरच्या परिचयामुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त सुरक्षा स्तर मिळणार आहे. त्याबरोबरच, या नव्या फीचरमुळे तुमच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापरही देखील टाळता येईल.
Screenshot Blocking फिचर वापरकर्त्यांना त्यांच्या अकाऊंटवर पूर्ण कंट्रोल देईल. हे फिचर सुनिश्चित करेल की, कोणीही तुमच्या फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ किंवा शेअर करू शकणार नाही. WhatsApp चे आगामी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. येत्या काळात हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआऊट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.