WhatsApp New Feature: नव्या आणि महत्त्वाच्या फीचरची एंट्री! आता कळेल कोण-कोण होते ऑनलाईन। Tech News

Updated on 30-Apr-2024
HIGHLIGHTS

WhatsApp चे नवे रिसेन्ट ऑनलाईन फीचर बीटा युजर्ससाठी रिलीज

WhatsApp च्या आगामी फीचर्सना ट्रॅक करणारी वेबसाइट Wabetainfo ने दिली माहिती

नव्या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर कोण आणि केव्हा ऑनलाइन आले हे समजेल.

WhatsApp सध्या प्लॅटफॉर्म सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. यापैकी अलीकडेच Recent Online फिचरबद्दल बातमी आली होती. दरम्यान, आता हे नवे फीचर रिलीज करण्यात आले आहे. नव्या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर कोण आणि केव्हा ऑनलाइन आले हे समजेल. यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारेल आणि हे साधन त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.

WhatsApp Recent Online फिचर

WhatsApp च्या आगामी फीचर्सना ट्रॅक करणारी वेबसाइट Wabetainfo ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ॲप स्टोअरवर उपलब्ध iOS 24.9.10.71 बीटा अपडेटवरून असे दिसून आले आहे की, ‘रीसेंटली ऑनलाईन फीचर’ ची टेस्टिंग सुरू झाली आहे. हे फीचर बीटा युजर्ससाठी रिलीज होण्यास सुरुवात देखील झाली आहे.

वरील पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. हे नवीन फीचर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असल्याचे समोर आले आहे. येथे, ते संपर्क दिसत आहेत, जे अलीकडेच प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन आले आहेत. यावरून युजर्सना अलीकडेच ऑनलाइन आलेल्या कॉन्टॅक्टची यादी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फीचरद्वारे संपर्कांशी संवाद करणे सोपे होईल, असे म्हटले जात आहे.

उपलब्धता

WhatsApp

वर सांगितल्याप्रमाणे, WhatsAppने नव्या रिसेन्ट ऑनलाईन फिचरची टेस्टिंग सुरु केली आहे. हे फिचर सध्या केवळ बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर हे फीचर जगभरातील सर्व युजर्ससाठी आणले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या काळात लवकरच तुम्हाला नव्या फिचरबद्दल अपडेट जारी केले जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :