WhatsApp कडून युजर्ससाठी मोठं गिफ्ट! आता इंटरनेटशिवाय करता येईल चॅट

Updated on 06-Jan-2023
HIGHLIGHTS

आता इंटरनेटशिवाय वापरता येईल WhatsApp

WhatsApp ने जगभरात प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे.

आता प्रॉक्सी सपोर्टद्वारे यूजर्स इंटरनेटशिवाय व्हॉट्सऍप चालवू शकतील.

WhatsApp यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. चांगल्या अनुभवासाठी WhatsApp सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. मेसेजिंग ऍप युजर्सना एक मोठं गिफ्ट देणार आहे. WhatsApp ने जगभरात प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे. आता प्रॉक्सी सपोर्टद्वारे यूजर्स इंटरनेटशिवाय व्हॉट्सऍप चालवू शकतील. ते त्यांच्या मित्रांशी इंटरनेटशिवाय चॅट करू शकतील. व्हॉट्सऍपच्या नवीन फीचरला यूजर्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : 200MP कॅमेरा असलेला 'हा' फोन 23000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध, पहा डील

आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हॉट्सऍप वापरकर्ते आता या प्लॅटफॉर्मवर इंटरनेटशिवाय जोडले जातील. युजर राहत असलेल्या परिसरात इंटरनेट उपलब्ध नसले तरी त्याला व्हॉट्सऍप वापरता येणार आहे. हे जाणून घ्या की, व्हाट्सएपच्या या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते जगभरातील संस्था आणि स्वयंसेवकांच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपशी कनेक्ट राहण्यास सक्षम असतील.

व्हॉट्सऍपने ट्विट केले आहे की, आम्ही मुक्तपणे आणि खाजगीरित्या संवाद साधण्याच्या तुमच्या हक्कांसाठी लढत राहू. आता WhatsApp सह थेट कनेक्ट करणे शक्य नसताना, तुम्हाला लोकांशी मुक्तपणे संवाद साधण्यात मदत करण्यासाठी समर्पित जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांनी सेट केलेल्या सर्व्हरद्वारे कनेक्ट राहू शकता.

पर्सनल मॅसेज सुरक्षित राहतील.

 

https://twitter.com/WhatsApp/status/1611032641557434371?ref_src=twsrc%5Etfw

 

दुसर्‍या ट्विटमध्ये, व्हॉट्सऍपने म्हटले आहे की, जर तुमच्या देशात व्हॉट्सअऍप ब्लॉक केले असेल, तर तुम्ही कनेक्ट राहण्यासाठी आणि मित्र आणि कुटुंबियांशी चॅट करण्यासाठी प्रॉक्सी वापरू शकता. प्रॉक्सीद्वारे WhatsApp शी कनेक्ट केल्यावर, वैयक्तिक संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्शनद्वारे संरक्षित केले जातील.

विशेष म्हणजे हा नवा पर्याय व्हॉट्सऍपच्या सेटिंग मेनूमध्ये आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सऍपचे लेटेस्ट व्हर्जन असायला हवे. व्हॉट्सऍपच्या मते, जर तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस असेल, तर तुम्ही सर्च इंजिन किंवा सोशल मीडियावर विश्वासार्ह प्रॉक्सी सोर्स शोधू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :