प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! WhatsApp चे New फीचर रोल आउट, चॅटसोबत दिसणार महत्त्वाचे कॅप्शन। Tech News
WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे.
WhatsApp ने रोलआऊट केलेल्या नव्या फिचर युजरची प्रायव्हसी आणखी मजबूत होईल.
समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे कळेल की तुमचे चॅट एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे.
आपणा सर्वांना माहितीच आहे की, WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. Meta च्या मालकीचे हे इन्स्टंट मेसेजिंग App केवळ Android आणि iOS साठीच नाही तर वेब आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी देखील नवीन फीचर्स आणण्यासाठी काम करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बर्याच फीचर्सची टेस्टिंग करण्यासाठी हे अपडेट्ससह बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहेत. त्याबरोबरच, अनेक सुविधांचे काम अजूनही सुरू आहे.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला WhatsApp ने रोलआऊट केलेल्या नव्या फिचरबद्दल सांगणार आहोत. हा फिचर सांगतो की, कोणते चॅट end-to-end encrypted आहे. आत्तापर्यंत ते केवळ निवडक बीटा युजर्ससाठी टेस्टिंग म्हणून जारी केला आहे. भविष्यात ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. बघुयात सविस्तर-
नव्या फिचरद्वारे प्रायव्हसी होणार आणखी मजबूत
WhatsApp च्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने या नव्या फीचरची माहिती दिली आहे. ताज्या अहवालानुसार, कंपनी एंड-टू-एंड एनक्रिप्टेडसाठी चॅट्सवर कॅप्शनसह चिन्ह दर्शवित आहे. याद्वारे, समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे कळेल की, चॅट एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये स्क्रीनशीत बघू शकता.
चॅटमध्ये दिसेल कॅप्शन
स्क्रीनशॉटनुमध्ये दिसत आहे की, चॅट आणि ग्रुप ओपन केल्यानंतर नावाच्या खाली एक लॉक चिन्ह आहे आणि त्यापुढे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड लिहिलेले आहे. याद्वारे समजते की, चॅट एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या माहितीद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या ऍक्टिव्ह चॅटचे सिक्योरिटी स्टेटस समजण्यास मदत होईल.
मात्र, लक्षात ठेवा की हे फिचर सध्या फक्त निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. भविष्यातील अॅप अपडेट्ससह ते प्रत्येकासाठी प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे या फीचरसाठी सर्व युजर्सना अजून थोडी वाट पहावी लागेल. एवढेचं नाही तर, कंपनी अनेक नवीन फीचर्स आणण्यावर देखील काम करत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile