WhatsAppवर दर महिन्याला काही नवीन फीचर येतात, जे वापरकर्त्याचा अनुभव वाढवतात. 2023 च्या सुरुवातीला WhatsAppवर नवीन फीचर्स जोडले गेले आहेत, जे खूपच जबरदस्त आहेत. आता व्हॉट्सऍपवर आणखी एक नवीन फीचर येत आहे, जे वापरकर्त्यांना नवीन सुविधा देईल. व्हॉट्सऍप एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती आहे, जी वापरकर्त्यांना चॅट आणि ग्रुपमध्ये मेसेज पिन करण्याची परवानगी देईल.
हे सुद्धा वाचा : BSNL ने लाँच केला नवीन प्लॅन, केवळ 107 रुपयांमध्ये मिळेल 60 दिवसांची वैधता आणि 3GB डेटा
वेबटेनफोच्या अहवालानुसार, हे फिचर उपयुक्त आहे कारण ते वापरकर्त्यांना चॅटच्या शीर्षस्थानी महत्त्वाचे मॅसेज पिन करण्यास अनुमती देईल. मॅसेज पिन केलेला असल्यास आणि प्राप्तकर्ता ऍपचे जुने अपडेट वापरत असल्यास, त्यांना ऍप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या नवीनतम आवृत्तीवर अपग्रेड करावे लागणार आहे.
याव्यतिरिक्त, पिन केलेले मॅसेज वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण मॅसेज सहजपणे ऍक्सेस करण्याची परवानगी देणार आहेत. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे फीचर अद्याप सर्वांसाठी आणले गेलेले नाही. अपडेट लवकरच सर्वांसाठी आणला जाईल.
व्हॉट्सऍपवर आणखी एक फीचर येत आहे, ज्यामुळे यूजर्स कॉलिंग शॉर्टकट तयार करू शकतील. हे फिचर अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल जे एकाच व्यक्तीला वारंवार कॉल करतात.